Wednesday, October 15, 2025
Home अन्य ‘बिग बॉस १५’मध्ये मेंटॉर म्हणून प्रवेश करण्यापूर्वी शेवटच्या क्षणी रुबीनाने केली शॉपिंग

‘बिग बॉस १५’मध्ये मेंटॉर म्हणून प्रवेश करण्यापूर्वी शेवटच्या क्षणी रुबीनाने केली शॉपिंग

‘बिग बॉस’चे १५ वे पर्व २ ऑक्टोंबर २०२१ पासून सुरू होणार आहे. जस जशी ही तारीख जवळ येत चालली आहे तस तशी प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या अनेक कलाकारांची नावे हळूहळू समोर येत आहेत. अशात सध्या गौहर खान, रुबीना दिलैक आणि श्वेता तिवारी या तिघी मेंटॉर म्हणून बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहेत. हे कलाकार पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार असल्याच्या चर्चेने चाहत्यांना खूप आनंद होत आहे.

‘बिग बॉस’ १४ ची विजेती अभिनेत्री असणाऱ्या रुबीनाने प्रेक्षकांच्या मनावर खूप राज्य केले आहे. मालिकांमध्ये तसेच बिग बॉसच्या घरात तिने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. सध्या काही दिवसांआधीच ती शॉपिंग करताना दिसली होती. तिच्या बरोबर तिचे बॉडीगार्ड देखील होते. तसेच त्यांच्या हातामध्ये मोठं मोठ्या सामानाने भरलेल्या पिशव्या होत्या. अनेकांना असे वाटत आहे की, बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी ऐनवेळी तिने शॉपिंगला सुरुवात केली आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचा वनपीस घातला होता. तसेच नो मेकअप लूकमध्ये तिचे नैसर्गिक सौंदर्य प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

बिग बॉस १४ मध्ये तिने निर्भीडपणे खेळून प्रेक्षकांचे मन जिंकले. या शोमध्ये ती प्रामाणिकपणे खेळली. साल २००८ मध्ये आलेली मालिका ‘छोटी बहू’ मधून तिने अभिनयास सुरुवात केली. त्यानंतर रुबीना ‘बनू मैं तेरी दुल्हनिया’, ‘साथ फेरे’, ‘छोटी बहू २’, ‘सास बिना ससुराल’, ‘ससुराल सिमर का’, ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’, ‘तू आशिकी’, ‘इश्क मे मरजावा’ अशा अनेक मालिकांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. रुबीना सध्या ‘शक्ति: अस्तित्व के पहचान की’ या मालिकेमध्ये झळकत आहे. या मालिकेमध्ये ती तृतीयपंथी सुनेची भूमिका साकारत आहे. लवकरच ही मालिका संपणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

श्रीदेवी यांच्या हिट गाण्यावर जबरदस्त नाचली पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान

मंसूर अली खान पतौडींच्या पुण्यतिथी दिनी सोहा अली खान शर्मिला टागोर यांनी घेतले त्यांच्या कब्रचे दर्शन

फॅन्सला पुन्हा झाला बिग बॉस फेम सोनाली फोगट यांच्या जबरदस्त डान्सचा ‘दिदार’

हे देखील वाचा