Sunday, May 19, 2024

फॅन्सला पुन्हा झाला बिग बॉस फेम सोनाली फोगट यांच्या जबरदस्त डान्सचा ‘दिदार’

सोशल मीडियाची क्रेझ खूपच तुफान आहे. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला सहज सोशल मीडियाची भुरळ पडते. या प्लॅटफॉर्मवर मिळणारे नावलौकिक, प्रसिद्धी खरंच मोठे असते. सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी नेटकरी, कलाकार मंडळी सतत काहींना काही पोस्ट करत फॅन्ससोबत कनेक्ट असतात. फोटो, व्हिडिओ, माहिती यासोबतच त्यांचे हटके व्हिडिओ देखील ते अनेकदा पोस्ट करताना दिसतात.

हरियाणाच्या सेलिब्रिटी आणि भाजपच्या नेता असणाऱ्या सोनाली फोगट ह्या देखील सोशल मीडियावर तुफान सक्रिय आहे. त्या नेहमी काही ना काही पोस्ट करताना दिसतात. सोनाली यांनी बिग बॉसमध्ये सहभाग घेतला आणि त्यांना अमाप लोकप्रियता, प्रसिद्धी मिळाली. बिग बॉसच्या घरात सोनाली फोगट आणि रुबीना यांच्यातील वाद खूपच गाजले होते. नेहमी त्या आपले हटके डान्स व्हिडिओ शेअर करणाऱ्या सोनाली यांनी पुन्हा त्यांचा एका नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या नवीन व्हिडिओमध्ये सोनाली ‘दिदार दे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्यांनी पांढऱ्या रंगाचा टॉप आणि क्रीम रंगाची ट्राऊजर घातली असून केस मोकळे सोडले आहे. या व्हिडिओ शेअर करून सोनाली यांनी पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेला हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

सोनाली फोगट यांच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३० हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज आले आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट्स करताना फॅन्सने लिहिले की, ‘कुठे वीज पडणार मॅडम, तुमच्या डान्सने तुम्ही वीज पडतच आहात.’, तर दुसऱ्या फॅनने लिहिले, ‘ग्रेट डान्स मॅडम’. आणखी एक फॅनने लिहिले, ‘चश्मेबद्दूर.’ सोनाली यांच्या या लटके झटके मारणाऱ्या व्हिडिओला खूपच पसंती मिळताना दिसत आहे. त्यांचा काही दिवसांपूर्वीच ‘आखिर तुन्हे आना है’ या गाण्यावरील डान्स व्हिडिओ देखील तुफान गाजला होता.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केबीसी १३’मध्ये महिला स्पर्धकाने ‘बिग बीं’ना विचारला ‘हा’ प्रश्न, अभिनेते म्हणाले, ‘मी सांगणार नाही…’

-करीना कपूरने केला परफेक्ट फॅमिली फोटो शेअर, समुद्र किनारी दिसले ‘सैफिना’चे कुटुंब

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

 

हे देखील वाचा