Sunday, May 19, 2024

मंसूर अली खान पतौडींच्या पुण्यतिथी दिनी सोहा अली खान शर्मिला टागोर यांनी घेतले त्यांच्या कब्रचे दर्शन

मंसूर अली खान पतौडी म्हणजेच सैफ अली खानचे वडील हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध आणि दिग्गज क्रिकेटपटू होते. शिवाय ते पतौडी खानदानाचे नववे नवाब देखील होते. याच मंसूर अली खान पतौडी यांची २२ सप्टेंबर रोजी दहावी पुण्यतिथी होती. २२ सप्टेंबर २०११ साली मंसूर अली खान पतौडी यांचे दुःखद निधन झाले होते. या पुण्यतिथीच्या निमित्ताने सोहा अली खान, शर्मिला टागोर आणि सोहाची मुलगी इनाया यांनी मंसूर अली खान यांच्या कब्रचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्रद्धांजली अर्पण करून दुवा देखील अदा केली.

सोहाने त्यांचे मंसूर अली खान पतौडी यांच्या कब्रचे दर्शन घेतानाचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले, “तुम्ही तोपर्यंत मृत नाही आहात, जोपर्यंत आम्ही तुमची आठवत काढू.’ सोहाने पोस्ट केलेले हे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, तिच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. सबा अली खानने सोहाच्या पोस्टवर हार्ट ईमोजी पोस्ट केले आहे. मात्र यावेळी सैफ अली खान उपस्थित नसल्याने अनेकांनी त्याला ट्रोल देखील केले आहे. सैफ सध्या करीना कपूरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवमध्ये आहे.

मंसूर अली खान पतौडी यांनी १९६९ साली सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री असणाऱ्या शर्मिला टागोर यांच्याशी लग्न केले होते. त्यांना सबा अली खान, सोहा अली खान आणि सैफ अली खान ही तीन मुलं आहेत. मंसूर अली खान पतौडी यांना जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक समजले जायचे. मंसूर अली खान पतौडी यांचा जन्म ५ जानेवारी १९४१ रोजी भोपाळ येथे झाला. त्यांचे वडील इफ्तिखार अली खान पतौडी हे देखील उत्तम क्रिकेटर होते. त्यांच्याकडूनच मंसूर यांना क्रिकेटचा वारसा मिळाला होता. मंसूर अली खान पतौडी यांना टायगर पतौडी या टोपणनावाने देखील ओळखले जायचे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केबीसी १३’मध्ये महिला स्पर्धकाने ‘बिग बीं’ना विचारला ‘हा’ प्रश्न, अभिनेते म्हणाले, ‘मी सांगणार नाही…’

-करीना कपूरने केला परफेक्ट फॅमिली फोटो शेअर, समुद्र किनारी दिसले ‘सैफिना’चे कुटुंब

-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी

हे देखील वाचा