मागील काही दिवसांपूर्वी एक गाणे चांगलेच गाजले होते. सोशल मीडियावर या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. ते गाणे म्हणजे ‘ओ शेठ’ होय. काही महिन्यांपूर्वी हे गाणे प्रदर्शित झाले. तेव्हापासून या गाण्याची सर्वत्र चर्चा चालू आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या गाण्यावर रील्स तयार केले आहेत. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी ‘ओ शेठ’ या लोकप्रिय गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. जो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
अभिनेत्री श्रुती मराठेने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुक्ता बर्वे, सुबोध भावे, आनंद इंगळे, उमेश कामत, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर हे कलाकार दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ते सगळे सुरुवातीला काहीच हावभाव करत नाहीत, पण नंतर सगळे कसेही डान्स करताना दिसत आहेत. (Marathi actors dance on o Sheth song, video viral on social media)
हा मजेशीर व्हिडिओ शेअर करून श्रुतीने लिहिले आहे की, “एक शेठ तर बाकी सव्वा शेठ,” त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक कलाकार तसेच त्यांचे चाहते या मजेशीर व्हिडिओवर कमेंट करत आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर तेजस्विनी पंडित, सुयश टिळक, सलील कुलकर्णी, गौरव घाटनेकर या कलाकारांनी हसण्याची ईमोजी पोस्ट केली आहे.
त्यांच्या एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “चाळिशीतील वाटत नाही तुम्ही.” आणखी एकाने “ठार येडे आहात सर्व,” अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने कमेंट केली आहे की, “इतके सगळे शेठ एकत्र आल्यावर राडा तर होणारच ना.”
त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. ‘ओ शेठ’ या सुपरहिट गाण्याचे बोल संध्या केशे आणि प्रनिकेत खुने यांनी लिहिले आहेत. याच दोघांनी या गाण्याला संगीत देखील दिले आहे. तसेच उमेश गवळी यांनी हे गाणे गायले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हिना खानचं ‘मैं भी बर्बाद’ गाणं रिलीझ; अभिनेत्रीने अंगद बेदीसोबत दिले बोल्ड सीन
-‘बोल्ड सीनमुळे दिला होता खालच्या पातळीची महिला म्हणून टॅग’, मल्लिका शेरावतचा खुलासा
-असा क्रूर खलनायक, ज्याच्या नावात जरी ‘प्रेम’ असले, तरी चित्रपटांमध्ये ‘ते’ कधीही दिसले नाही