गेल्या अनेक दिवसांपासून आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. अशात साल २०२१मध्ये नाताळच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणखी लांबणीवर पोहचली आहे. याचे कारण आमिर खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.
ठाकरे सरकारने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रामध्ये चित्रपटगृह बंद ठेवले होते. अशात २० ऑक्टोबर पासून सर्व काही ठीक असल्यास सिनेमागृह सुरू करण्यास शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले. बॉलिवूडमध्ये या निर्णयामुळे सुखाची आणि आनंदाची लाट पसरली. (Actor Aamir Khan has postponed his upcoming movie release date now film will release valentine day)
मुंबईमधील चित्रपटगृह तर आता सुरू होणार आहेत. मग तरी देखील आमिरने त्याचा चित्रपट लांबणीवर का टाकला असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
आमिरने प्रोडक्शन हाऊसच्या ट्वीटर अकाउंटवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहिती दिली आहे. त्याने सांगितले की, “आम्ही हा चित्रपट नाताळाच्या मुहूर्तावर प्रदर्शित करणार होतो. परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता आम्ही यासाठी अजून सज्ज झालेलो नाही. त्यामुळे आम्ही हा चित्रपट आता साल २०२२ मध्ये व्हॅलेंटाईन डेला प्रदर्शित करणार आहोत.”
#AamirKhan #KareenaKapoorKhan @Viacom18Studios #AdvaitChandan #AtulKulkarni #PritamDa #AmitabhBhattacharya #LaalSinghChaddha pic.twitter.com/aN5H6fG4dG
— Aamir Khan Productions (@AKPPL_Official) September 26, 2021
या निर्णयामुळे चित्रपटगृह खुली होणार म्हणून सुखवलेले प्रेक्षक पुन्हा एकदा नाराज झाले आहेत.
‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाची शूटिंग (शुक्रवारी) १७ सप्टेंबरला पूर्ण झाली. त्यानंतर शूटिंग पूर्ण झाल्याचा आनंद सर्व टीमने साजरा केला. यावेळी करीना देखील तेथे उपस्थित होती. ‘लाल सिंग चड्ढा’ हॉलिवूड सुपरहीट चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चा रिमेक आहे. या चित्रपटाला ६ अकादमी पुरस्कार देखील मिळाले आहेत. ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाची पटकथा अतुल कुलकर्णीसह एरिक रोथ यांनी लिहिली आहे. तसेच याचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहेत. त्यांनीच आमिरला सुपरस्टार बनवले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-देव आनंद यांच्या रूपावर मरायच्या तरुणी, ‘यामुळे’ त्यांना सूट घालण्यावर शासनाने आणली होती बंदी
-अर्चना पूरन सिंग यांनी रात्री पळून जाऊन केलं होतं लग्न, बरंच चर्चेत राहिलंय त्यांचं वैयक्तिक आयुष्य










