Thursday, July 23, 2026
Home टेलिव्हिजन ‘बिग बॉस 20’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, तर हा अभिनेता करणार पुन्हा होस्टिंग

‘बिग बॉस 20’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, तर हा अभिनेता करणार पुन्हा होस्टिंग

सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’ आहे. या शो ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. तर या प्रेक्षकांसाठी या शो बाबत एक महत्वाची अपडेट आहे. ‘बिग बॉस’चा नवीन सीझन आता पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी आता या शोची अधिकृत घोषना केली आहे. तर मागील 16 वर्षा प्रमाणे या शो चे सुत्रसंचालन अभिनेता  सलमान खान करणार आहे. तर निर्मात्यांनी नुकतेच शोचा लोगो जो डोळा आहे. त्याचे एक नवीन व्हर्जन प्रसिध्द केले आहे. म्हणजे हे आगामी सिझनची अधिकृत घोषणा होती.

बिग बॉस 20 च्या या घोषनेनंतर अनेक या शोचे चाहते उत्सुक झाले आहेत. बिग बॉस 20 कलर्स टीव्हीवर प्रसारित होईल आणि प्रेक्षक जिओ हॉटस्टारवरही पाहु शकतील.तर निर्मात्यांनी अद्याप प्रीमियरची तारीख जाहीर केलेली नाही. पण हा सीझन सप्टेंबर 2026 मध्ये शक्यता आहे.

बिग बॉसचा नवीन लोगो निर्मात्यांनी प्रदर्शित करताच, सोशल मिडीयावर नेटकरी प्रतिसाद देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “काय मेजवानी आहे, रिॲलिटी शोचा राजा! या सीझनसाठी खूप उत्सुक आहे.” दुसऱ्याने म्हटले, “बिग बॉस २० आणि सलमान (salman)खानला पुन्हा पाहण्यासाठी थांबू शकत नाही.” असे अनेक दमदार प्रतिक्रिया सध्या सोशल मिडियावर येत आहेत.

बिग बॉसचा नवीन सीझन प्रेक्षकांसाठी एक मोठी आंनदाची बातमी घेउन येत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, निर्मात्यांनी जाहीर केले की या वर्षीचा बिग बॉस आतापर्यंतचा सर्वात मोठा बहुभाषिक रोलआउट असेल. यावेळी, तो सहा भाषांमध्ये सुरू होईल. शोचा नवीन सीझन हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि बंगाली आवृत्त्यांमध्ये प्रसारित होईल. विशेष म्हणजे, सर्व सहा आवृत्त्या एकाच वेळी सुरू होतील.

मीनाक्षींची दमदार एन्ट्री,’हिरो’ची आयकॉनिक जोडी 40 वर्षांनंतर पुन्हा दिसणार ऑनस्क्रीन

हे देखील वाचा