तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय ( vijay Thalapathy) यांच्या ‘जना नायकन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त उत्सवाचे वातावरण आहे. प्रेक्षकांनी काल संध्याकाळपासूनच चित्रपटाच्या प्रदर्शनाचा जल्लोष सुरू केला. आज, २३ जुलै रोजी चित्रपट प्रदर्शित होताच, मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये गर्दी केली. दरम्यान, अभिनेत्री त्रिशा कृष्णन देखील ‘जना नायकन’ पाहण्यासाठी पोहोचली.
अभिनेत्री त्रिशा कृष्णन गुरुवारी ‘जना नायकन’ पाहण्यासाठी चेन्नईच्या रोहिणी थिएटरमध्ये पोहोचली. ही अभिनेत्री चित्रपटगृहाकडे जाताना दिसली. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्रिशा वेस्टर्न लूकमध्ये सुंदर दिसत आहे.
एच. विनोद दिग्दर्शित ‘जना नायकन’ हा थलपथी विजयचा शेवटचा चित्रपट आहे, कारण तो आता पूर्णपणे राजकारणात सक्रिय झाला आहे. हा चित्रपट त्याच्या मूळ प्रदर्शन तारखेनंतर जवळपास सात महिन्यांनी प्रदर्शित झाला आहे. सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी न मिळाल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब झाला होता. दरम्यान, हा चित्रपट ऑनलाइन लीकही झाला होता. बऱ्याच प्रतीक्षेनंतर, प्रेक्षकांना अखेर तो चित्रपटगृहांमध्ये पाहता येत आहे.
‘जना नायकन’ या चित्रपटात विजयसोबत पूजा हेगडे देखील आहे. बॉबी देओल आणि प्रकाश राज यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंद्रन यांनी दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजयला या चित्रपटासाठी अंदाजे २२० कोटी ते २७५ कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे. जर हे मानधनाचे आकडे खरे मानले तर, विजय भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरलाआहे.
हेही वाचा










