बॉलिवूडचे असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या करिअरची सुरुवात एकदम जबरदस्त करतात आणि सुरुवात करताच प्रसिद्धी मिळवतात. तर काही कलाकार असे असतात, ज्यांना अनेक भूमिका साकारल्यानंतर ओळख मिळते. शिवाय काही कलाकारांची जादू ही फार काळ टिकते, तर काहींची एका रात्रीत संपते. त्यामुळे त्यांना पुढे चित्रपटात काम करायची संधी मिळत नाही.
असेच एक अभिनेते आहे जे पदार्पण चित्रपटाद्वारेच प्रेक्षकांवर आपली जादू करण्यात यशस्वी ठरले. मात्र पुढे त्यांना ती जादू टिकवता आली नाही. हे अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून, अभिनेते राहुल देव हे आहेत. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका साकारल्या आणि वेगळी ओळख निर्माण केली. राहुल देव सोमवारी (27 सप्टेंबर) आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
राहुल देव हे मूळचे दिल्लीचे आहेत. चित्रपटांशिवाय ते ‘बिग बॉस’मध्येही दिसले होते. राहुल यांनी २००० मध्ये ‘चॅम्पियन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सनी देओलसोबतच अभिनेत्री मनीषा कोयराला देखील मुख्य भूमिकेत होती. राहुल देव यांना या चित्रपटातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. ‘चॅम्पियन’ या चित्रपटानंतरही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. बॉबी देओलच्या २३ मार्च १९३१: शहीद या चित्रपटात त्यांनी सुखदेवची भूमिका साकारली होती. त्यांनी फक्त हिंदी चित्रपटात काम केले नाही. तर त्यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळम, पंजाबी, बंगाली आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू केली आहे.
पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारे राहुल देव, हे प्रेमात देखील पडले. राहुल देव आणि मुग्धा गोडसे हे अनेक वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. राहुल देव हे त्यांच्या रिलेशनशिपमुळेही अनेकदा चर्चेत येतात. राहुल आणि मुग्धा गोडसे यांच्यात जवळजवळ 18 वर्षांचा फरक आहे. मात्र दोघांची केमिस्ट्री जबरदस्त आहे. दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात आणि नेहमी आपल्या नात्याचा स्वीकार करतात.
राहुल आणि मुग्धा यांची पहिली भेट २०१३ मध्ये झाली. त्यानंतर हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले. राहुल आणि मुग्धा एकाच गुरूचे शिष्य आहेत. एका मुलाखतीत मुग्धा गोडसे म्हणाली होती की, “राहुल अशी व्यक्ती आहे, ज्यावर मी विश्वास ठेवू शकते.” त्याचबरोबर, राहुल देवही म्हणाले होते की, “गुरूमुळेच आम्ही एकमेकांना समजून घेऊ शकलो आणि मला हे देखील समजले की जीवन आपल्याला दुसरी संधी देते.”
याच्या व्यतिरिक्त राहुल देव यांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचा कॅन्सरने दुर्दैवी मृत्यू झाला. जेव्हा ते ‘बिग बॉस १०’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून आले होते, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, ते या शोमध्ये फक्त त्यांच्या मुलासाठी आले आहेत. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांना पैश्यांची गरज होती, असे त्यांनी सांगितले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘तब्बल ३५ वर्षे काम करूनही आमच्याकडे मागतात…’, सुधा चंद्रन यांनी उघडली इंडस्ट्रीची लाजिरवाणी गुपितं
चित्रपटात रोमँटिक सीन देऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे यश चोप्रा होते ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात वेडे