Saturday, March 21, 2026
Home अन्य बॉयफ्रेंड विकी जैनच्या मिठीत दिसली अंकिता, रोमॅंटिक फोटोंचा कोलाज व्हिडिओ व्हायरल

बॉयफ्रेंड विकी जैनच्या मिठीत दिसली अंकिता, रोमॅंटिक फोटोंचा कोलाज व्हिडिओ व्हायरल

 

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. अंकिताने तिच्या पहिल्या मालिकेतून तिची प्रेक्षकांवर छाप सोडली. आज अंकिता टेलिव्हिजनसोबतच बॉलिवूडमध्ये देखील काम करते. हिंदी चित्रपटसृष्टीतही तिने तिच्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. अंकिताची लोकप्रियता तिच्या सोशल मीडियावरील फॉलोवर्सवरून लक्षात येते.

अंकिता सध्या तिच्या आगामी पवित्र रिश्ता २.० या शोमुळे सतत चर्चेत आहे. मात्र यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत येते. अंकिता विकी जैनला डेट करते हे तर सर्वांनाच माहित आहे. या दोघांचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. अंकिता नेहमीच विकीच्या कुटुंबासोबत, त्याच्यासोबत बाहेर जाताना सुट्ट्यांचा आनंद घेतांना दिसते.

यातच आता अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने विकी आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांसोबतच्या काही फोटोंचे कोलाज केले आहे. या व्हिडिओमध्ये असलेल्या सर्वच फोटोंमध्ये अंकिता खूपच आनंदी दिसत असून, तिच्यासोबत इतर कुटुंबातील सदस्य देखील खूपच खुश दिसत आहे. या व्हिडिओमधील काही फोटोंमध्ये अंकिता आणि विकी एकमेकांच्या मिठीत दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना अंकिताने लिहिले, “जेवढे शक्य असेल तेवढे आजमध्ये आकंठ बुडा. दृश्य, आवाज, वास, भावना, जिंकणे, दुःख. हे सर्व आपल्या रोजच्या आयुष्यातील आहेच, आपण अनेकदा त्यांना विसरून जातो आणि प्रत्यक्षात आपण त्यांची स्तुती करतो.” तिच्या या व्हिडिओवर फॅन्स भरभरून कमेंट्स करत असून, कलाकारही त्यांचे मतं व्यक्त करत आहे.

अंकिताचे तिच्या बॉयफ्रेंडवर विकी जैनवर असणारे प्रेम ती नेहमीच सोशल मीडियाद्वारे व्यक्त करते. अंकिताने एका मुलाखतीमध्ये तिच्या आणि विकीच्या लग्नाच्या प्लॅनबद्दल सांगितले. ती म्हणाली, “विकीबरोबर लग्न करण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. लवकरच आम्ही दोघेजण लग्नाच्या बंधनात अडकणार आहोत. मला डेस्टिनेशन वेडिंग करायचे आहे. त्यासाठी माझी राजस्थानमधील जयपूर, जोधपूरला पहिली पसंती आहे. लग्नाबाबत आमचे प्लॅनिंग सुरू झाले आहे. पण आता मी त्याबाबत काहीच सांगणार नाही. मात्र, योग्य वेळ आल्यानंतर याची माहिती सर्वांना नक्की देणार.’ तिचे फॅन्स या दोघांच्या लग्नाबाबत खूपच उत्सुक असून, लवकरच ते ही आनंदाची बातमी देतील अशी सर्वांची आशा आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप

-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ

हे देखील वाचा