बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर हे सतत त्यांच्या विधानामुळे चर्चेत येत असतात. आता पुन्हा एका ते असं काही बोलले आहेत, ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खरं तर जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात विधान केलं आहे. आता हे विधान त्यांना चांगलंच महागात पडलेलं दिसत आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, जावेद अख्तर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आरएसएसची तुलना तालिबानसोबत केली आहे. त्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. जावेद अख्तर यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात वकील संतोष दुबे यांनी एफआयआर दाखल केला आहे. (fir on bollywood javed akhtar he compare rss to taliban)
‘माफी मागण्याचेही केले होते आवाहन’
वकील संतोष दुबे यांनी एका संभाषणात म्हटले आहे की, “मी आधी जावेद अख्तर यांना कायदेशीर नोटीस पाठवून त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास सांगितले होते. पण त्यांनी तसे काहीही केले नाही. आता माझ्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.”
मागितली होती १०० कोटींची भरपाई
संतोष दुबे यांनी यापूर्वी म्हटले होते की, जर जावेद अख्तर यांनी विनाशर्त लेखी माफी आणि नोटीसला सात दिवसांच्या आत प्रतिसाद दिला नाही, तर नुकसान भरपाई म्हणून १०० कोटी रुपये मागून त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात येईल. ते म्हणाले होते की, जावेद अख्तर यांनी केलेले वक्तृत्व आयपीसीच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत गुन्हा आहे.
‘हे’ होते जावेद यांचे विधान
जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, “आरएसएसचे समर्थन करणाऱ्या लोकांची मानसिकता तालिबानसारखीच आहे. या संघाचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. तुम्ही पाठिंबा देता त्यांच्यात आणि तालिबानमध्ये काय फरक आहे?” जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यानंतरच अनेकांनी त्यांना लक्ष्य केले. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावरही प्रचंड ट्रोल करण्यात आले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी
-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त










