Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

देखणं रूप! हिरव्या बांगड्या, कपाळावर टिकली अन् पिवळी साडी नेसून राजेश्वरीने दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा

भारतातील प्रत्येक सणाला महत्व आहे. रूढी, परंपरा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन प्रत्येक सण आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. अशातच संपूर्ण भारतात नवरात्र या सणाला सुरुवात झाली आहे. नऊ दिवसांच्या या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. पुरातन काळात महिषासुराचा वध करण्यासाठी दुर्गामातेने नऊ दिवस तिची वेगवेगळी रूपे दाखवून त्याच्याशी लढा दिला होता. या नऊ दिवसात स्त्री शक्तीचा सन्मान तसेच आदर करतात. तसेच देवीमातेची आराधना करतात. तसेच या नऊ दिवसात नऊ वेगवेगळ्या रंगांना महत्व आहे.

गुरुवारी (७ ऑक्टोबर) घटस्थापना झाली आहे. पहिल्या दिवसाचा रंग पिवळा आहे. पिवळा रंग हा निसर्गाची शक्ती, तेज आणि आनंदाचे प्रतीक आहे. यानिमित्त अनेक महिला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करत आहेत. यात आपल्या मनोरंजन क्षेत्रात देखील नवरात्र जोरदार साजरी होत आहे. यातच अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Actress Rajeshwari kharat give best wishes of Navratri on social media)

राजेश्वरीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने नवरात्री विशेष आजच्या पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. या साडीवर तिने सुंदर अशी ज्वेलरी, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या, कपाळावर टिकली लावली आहे. तसेच तिची हेअरस्टाईल देखील अगदी सुंदर दिसत आहे. तिने हातावर एक काळ्या रंगाची ओढणी घेतलेली दिसत आहे.

हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. शक्तीची देवता असलेली अंबेमाता आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देवो अशी अंबेमातेच्या चरणी प्रार्थना करते.” तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून २०१३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने २०१७ साली ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. तसं पाहायला गेलं, तर राजेश्वरीने जास्त चित्रपटात काम केले नाही. मात्र, कमी कालावधीत तिने चांगले नाव कमावले आहे. सोशल मीडियावर तिचा लाखोंमध्ये चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिची कोणतीही पोस्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. नुकतेच तिने तिच्या आगामी ‘रेडलाईट’ या चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात ती वेश्या भूमिकेत दिसणार आहे. तिचे चाहते तिचा हा चित्रपटात पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-‘हम दो हमारे दो’ सिनेमामुळे प्रेक्षकांची ही दिवाळी ठरणार ‘फॅमिलीवाली’

-रणबीरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षी होणार सुरु, ‘या’ भूमिकेत दिसणार लव्हर बॉय

हे देखील वाचा