Saturday, May 23, 2026
Home अन्य नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांचे रोमॅंटिक फोटोशूट, फोटो पाहून त्यांच्या लग्नावर झाले शिक्कामोर्तब

नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांचे रोमॅंटिक फोटोशूट, फोटो पाहून त्यांच्या लग्नावर झाले शिक्कामोर्तब

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सतत चर्चा होत असतात. मध्यंतरी त्या पती निखिल जैन सोबतच्या वादामुळे चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या आणि अभिनेता यश दासगुप्ताच्या प्रेम प्रकरणाची चर्चा माध्यमात नेहमी चांगलीच रंगलेली असते. नुकताच नुसरत जहाँ यांनी यश दासगुप्ता सोबत फोटोशुट केले असून, या शूटमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. फोटोमध्ये नुसरत जहाँ यांनी यश दासगुप्ताच्या मांडीवर बसून रोमॅंन्टिक पोज देत फोटो काढले आहेत. ज्यामुळे दोघांनी लग्न केल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

नुसरत यांनी आपल्या पती निखिल जैन सोबतच्या लग्नाला अवैध आहे म्हणत त्या त्यांच्यापासून वेगळ्या झाल्या. अलिप्त झालेल्या नुसरत प्रेग्नंट असल्याच्या बातमीने बरेच लाईमलाइट मिळवले. पती निखिल जैन यांनी नुसरत यांचे मूल माझे नसल्याचेही स्पष्ट केले होते. नुसरत यांनी २६ ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला होता. यानंतर त्या बंगाली अभिनेता यश दासगुप्ता सोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आल्या होत्या. पती निखिल जैनने मुलगा माझा नसल्याचा दावा केल्याने मुलाच्या पित्यावरून नुसरत यांना मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मुलाचा जन्मदाखला समोर आला ज्यामध्ये पिता म्हणून यश दासगुप्ताच्या नावाचा उल्लेख होता.

नुसरत जहाँ सोशल मीडियावर सतत एक्टिव असतात. सोशल मीडिया अकाऊंटवरुन नवनवीन फोटो चाहत्यांशी शेअर करताना त्या दिसतात. तत्पूर्वी नुसरत आणि यशच्या रोमॅंन्टिक फोटोंवरून दोघांनी लग्न केल्याचे दिसून येत आहे. याबाबत दोघांनी ही अधिकृत माहिती अजून दिलेली नाही. परंतु एका कार्यक्रमामध्ये बोलताना नुसरत यांनी त्यांच्या आणि यशच्या नात्याबद्दल सांगितल होते . यावेळी ती “लोकांना काय माहीत आहे मूल लग्नाआधी झाले आहे की लग्नानंतर.”

यापूर्वी नुसरत पती निखिल जैन सोबतच्या वादामुळे चर्चेत आल्या होत्या. नुसरत आणि निखिल २०१९ मध्ये विवाहबद्ध झाले होते. लग्नाच्या काही वर्षांतच त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. त्यामुळेच निखिलने हे मूल माझ नसल्याचे सांगितले होत.

दरम्यान, या संपूर्ण वादाबद्दल बोलताना नुसरतने आमच लग्न परदेशात झाले असल्याने तुर्की लग्न कायद्यानुसार ते भारतात अमान्य आहे. कारण त्यावेळी दोन धर्मामध्ये विवाह झाला होता ज्याला भारतात मान्यता देण्याची गरज होती, परंतु असे झाले नाही. त्यामुळे यामध्ये घटस्फोटाचा प्रश्नच येत नाही असे त्यांनी स्पष्ट केले होते. कायद्याने हा विवाह नसून लिव्ह इन रिलेशनशीप असल्याचे ही त्या म्हणाल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-महाअष्टमीचे निमित्य साधत अनुष्काने शेअर केला वामिकाचा फोटो, म्हणाली ‘रोज तुझ्यात…’

‘या’ कलाकारांनी गुपचूप लग्न करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

सैफ अली खानने तैमूरबद्दल केला खुलासा म्हणाला, ‘जेहच्या जन्मानंतर तैमूर अधिक…’

हे देखील वाचा