छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी शोपैकी एक असलेला ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अनेक मोठे बॉलिवूड कलाकार पाहुणे म्हणून दिसत असतात. यावेळी ९० च्या दशकातील तीन मोठ्या जुही चावला, आयशा झुल्का आणि मधू शाह या अभिनेत्री शोमध्ये दिसणार आहेत. यादरम्यान, शोमध्ये ९० च्या दशकातील मजेदार किस्से ऐकायला मिळणार आहेत. दरम्यान, जॅकी श्रॉफच्या गेटअपमध्ये शोमध्ये कृष्णा अभिषेक दिसणार आहे. त्यामुळे विचार करा, शोमध्ये किती मजा आणि किती धमाल असणार आहे. शोचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात जग्गू दादा बनलेला कृष्णा प्रेक्षकांना आणि पाहुण्यांना त्याच्या अनोख्या अंदाजाने खूप हसवताना दिसतो.
जॅकी श्रॉफ बंगल्यात नाही, तर एका कुंडीत राहतात
या प्रोमोमध्ये कृष्णा अभिषेक जॅकी श्रॉफच्या रूपात दिसत आहे. तो स्टेजवर येतो आणि सर्वांना भिडू म्हणताना दिसतो, तेव्हाच तो म्हणतो की, त्याने त्याच्या बंगल्यावर ३०० झाडे लावली आहेत आणि आता तो बंगल्यात नाही, तर एका कुंडीत राहतो. हे ऐकून स्टेजवर उपस्थित असलेली जुही चावला, आयशा झुल्का आणि मधू मोठ्याने हसतात. त्याचबरोबर कपिल शर्माला देखील हसू आवरत नाही.
मधू जुही चावलाची आहे छोटी जाऊ
त्याचबरोबर शोमध्ये एक खुलासा देखील झाला आहे. जुहीने सांगितले की, अभिनेत्री मधू नात्यात तिची छोटी जाऊ आहे. कपिल शर्माने शोमध्ये आलेल्या जुही चावलाला विचारले की, त्याने ऐकले आहे की, तू आणि मधू नातेवाईक आहात.”
यावर उत्तर देताना जुही म्हणते, “होय, ती माझी छोटी जाऊ आहे.” जुही, आयशा आणि मधू हे सगळे ९० च्या दशकातील स्टार अभिनेत्री होत्या. ‘रोजा’ चित्रपटात मधूने दमदार कामगिरी केली होती.
याशिवाय ती अनेक चित्रपटांमध्येही दिसली आहे. आयशा झुल्काबद्दल बोलायचं झालं, तर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अभिनयाला रामराम ठोकत लग्न केले. सध्या ती स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मस्तच! सबाने शेअर केला शर्मिला अन् मन्सूर अली यांच्या साखरपुड्याचा फोटो, चाहते म्हणाले…
-काय सांगता! ‘द फ्लॅश’मध्ये पाहायला मिळणार दोन व्हर्जन; इझरा मिलरचा ‘डीसी फँडम’मध्ये खुलासा
-पत्नीची प्रेग्नेंसी नाही, तर ‘हे’ आहे शो बंद करण्यामागचं खरं कारण; कपिल शर्माचा मोठा खुलासा










