बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतील क्रूझवर अं’मली पदार्थ प्रकरणात अडकला आहे. आर्यनची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. मात्र, आता त्याच्या या प्रकरणाचा फटका सलमान खानचा आगामी चित्रपट ‘टायगर ३’ला बसताना दिसत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, अं’मली पदार्थ प्रकरणात आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरुख खान अभिनित ‘पठाण’ चित्रपटाची शूटिंग पुढे ढकलण्यात आली आहे. ज्यावेळी आर्यनला अटक झाली होती, तेव्हाच शाहरुख ‘पठाण’च्या शूटिंगसाठी स्पेनला चालला होता. मात्र, त्याला शूटिंग स्थगित करावी लागली. ‘टायगर ३’ आणि ‘पठाण’ चित्रपट एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे आर्यन प्रकरणाचा परिणाम सलमानच्या चित्रपटावरही होत आहे.
खरं तर, शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात सलमान आणि कॅटरिना कैफ ‘टायगर आणि झोया’ या भूमिकेत दिसतील. असेही म्हटले जात आहे की, जिथे ‘पठाण’ची कहाणी संपेल, तिथूनच ‘टायगर ३’ चित्रपटाची कहाणी सुरू होईल. म्हणजेच ‘पठाण’चा क्लायमॅक्स सीन हा ‘टायगर ३’ची सुरुवात असेल. (Actor Shahrukh Khan Pathan And Salman Khan Starrer Tiger 3 Shoots Cancelled Due To Aryan Khan Drugs Case)
शाहरुखने पुढे ढकलल्या सर्व शूटिंग
माध्यमांतील वृत्तांनुसार, आता शाहरुखचा मुलगा आर्यन अं’मली पदार्थ प्रकरणात अडकल्यानंतर सर्व कामे पुढे ढकलली आहेत. तो पुढील कामांचा निर्णय आर्यनच्या जामीनानंतरच घेईल. अशामध्ये सलमान खानच्या ‘टायगर ३’ चित्रपटावरही याचा परिणाम होत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सूत्रांनी सांगितले की, ‘पठाण’ चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद २ ऑक्टोबरला स्पेनसाठी निघाले होते. मात्र, आर्यनची बातमी मिळताच ते परत आले. सिद्धार्थ तिथे चित्रपटातील दोन गाण्यांच्या शूटिंगसाठी गेले होते. दुसरीकडे शाहरुख एटलीच्या चित्रपटाचीही शूटिंग करत होता. मात्र, तीदेखील थांबवण्यात आली. यामुळे एटली, शाहरुख खानचा डुप्लिकेट प्रशांत वाल्देसोबत पुढील शूटिंग करत आहेत.
२० ऑक्टोबरला होणार जामीनावर निर्णय
आर्यन खानला २ ऑक्टोबर रोजी मुंबईवरून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये टाकलेल्या छाप्यादरम्यान एनसीबीने अटक केली होती. आर्यन सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. २० ऑक्टोबर रोजी त्याच्या जामीनावर निर्णय घेण्यात येणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सलमान खान आर्यनच्या प्रकरणावर जवळून लक्ष ठेवून आहे. आर्यनच्या अटकेनंतर तो शाहरुख आणि गौरीला भेटण्यासाठी ‘मन्नत’वरही गेला होता. तेव्हापासून तो शाहरुखला आधार देऊन त्याचे मनोबल वाढवत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बीच बॉम्ब’ मीरा राजपूतने शेअर केला तिचा ग्लॅमरस, मादक बिकिनी फोटो
-कार्तिक आर्यन नेटफ्लिक्सवर करणार जबरदस्त ‘धमाका’, ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे










