टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शोपैकी एक ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आहे. गेल्या १३ वर्षांपासून हा शो चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षक या शोमधील प्रत्येक पात्राचे चाहते आहेत. त्याचे एक विशेष कारण हे आहे की, सर्व वयोगटातील प्रेक्षक हा शो आवडीने पाहतात. अलीकडेच, शोमध्ये ‘बाघा’ ची भूमिका साकारणाऱ्या तन्मय वेकारियाने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात जेठालालपासून ते तारक मेहता फेम सर्व कलाकार दिसले होते. या फोटोत गोकुळधाम सोसायटीचे चंपकलाल अर्थात जेठालालचे ‘बापूजी’ सुद्धा दिसत आहेत, ज्यांची ओळख प्रेक्षकांसाठी ‘टेठी खीर’ सारखी झाली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम तन्मय वेकारियाने स्वत:चा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेते दिलीप जोशी अर्थात शोच्या जेठालाल, अंबिका रांजणकर, श्रीमती हाथी, अमित भट्ट म्हणजेच चंपकलाल त्यांच्या मित्रांसोबत दिसत आहेत.
या फोटोमध्ये दिलीप जोशी, अंबिका, तन्मय हे सर्व प्रासंगिक पोशाखात आहेत आणि ते त्यांच्या सुंदर स्मितहास्य करताना दिसतात. तन्मयने लिहिले की, “काही आठवणी कायम हृदयात राहतात. २००७ मध्ये दया भाई दोध दया @australia आणि @purenewzealand या गुजराती नाटकाचा एक अद्भुत दौरा.”
फोटोमध्ये जेठालालला चाहत्यांनी ओळखले आहे, ते पांढऱ्या शर्टमध्ये दिसत आहेत. त्याचवेळी चंपक काकांच्या भूमिकेत दिसणारे जेठालालचे ‘बापूजी’ फोटोत पिवळ्या शर्टमध्ये दिसत आहेत. अमित अर्थात बाबूजींचा चेहरा फोटोत फक्त आंशिक रुपात दिसत असला, तरीही त्याच्या चाहत्यांनी त्याला लगेच ओळखले आहे.
शोमध्ये कोमल हाथीची भूमिका साकारणाऱ्या अंबिका रांजणकर यांनी या फोटोवर कमेंट करत म्हटले की, “सर्वात संस्मरणीय प्रवास, सर्वात संस्मरणीय नाटक आणि आतापर्यंतची सर्वोत्तम टीम.”
नुकतेच तारक कुटुंबातील एक महत्त्वाचे सदस्य घनश्याम नायक यांचे निधन झाले. या बातमीने सर्व अभिनेते, क्रू आणि तंत्रज्ञ हादरले आहेत. दिलीप जोशी, मंदार चांदवडकर, समय शाह, मुनमुन दत्ता आणि इतर अनेकजण त्यांच्या अंत्यविधीला शेवटचा निरोप घेण्यासाठी पोहोचले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी