अं’मली पदार्थ प्रकरणात तुरुंगात बंद असलेला मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी, अभिनेता शाहरुख खान मुंबईच्या आर्थर रोड जेल पोहोचला आहे. शाहरुख पहिल्यांदाच त्याच्या मुलाला भेटायला तुरुंगात आला आहे. मुलाला भेटल्यानंतर शाहरुख खान १५ मिनिटे त्याच्याशी बोलला. तसेच तुरुंगातून बाहेर येताना अभिनेत्याने मीडियाशी बोलणे टाळले. दुसरीकडे, बुधवारी सत्र न्यायालयात आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आर्यन खान प्रकरणात जामिनाला सातत्याने विरोध करत आहे. एनसीबीचे सर्व युक्तिवाद प्रामुख्याने व्हॉट्सऍप चॅटवर आधारित आहेत. आता त्याच्या वकिलांनी आर्यनच्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (shahrukh khan reached arthur road jail to meets his son aryan khan who arrested in drugs case)
आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना ३ ऑक्टोबर रोजी, एनसीबीने अं’मली पदार्थांचा ताबा, कट, उपभोग, खरेदी आणि तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. इतक्या दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आर्यनला शाहरुख खान प्रथमच भेटला आहे. आतापर्यंत शाहरुखची मॅनेजर आर्यनच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी तुरुंगात येत-जात होती.
शाहरुखकडे त्याच्या मुलाला जामीन मिळवून देण्यासाठी केवळ सात दिवस आहेत. कारण लवकरच न्यायालयात दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत आर्यन खानचे वकिल त्याला लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि इतर आरोपींना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बॅरेक क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, नंतर आर्यनला वेगळ्या कक्षात हलवण्यात आले. आर्यन आणि तुरुंगातील इतरांना अं’मली पदार्थातून बरे होण्यासाठी समुपदेशन देखील केले गेले. कारागृहात समुपदेशनादरम्यान आर्यन खान म्हणाला होता की, तो भविष्यात असे कोणतेही काम करणार नाही, ज्यामुळे तो चुकीच्या कारणामुळे चर्चेत येईल. तसेच गरीबांना मदत करण्याचे देखील काम करेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’
-‘हाय प्रोफाइल असण्याची किंमत मोजावी लागते’, म्हणत जावेद अख्तर यांनी व्यक्त केली आर्यनची चिंता
-‘या’ कारणामुळे शाहरुखने आपल्या लाडक्याचे नाव ठेवले होते ‘आर्यन’, मुलीशी आहे कनेक्शन