Wednesday, January 21, 2026
Home बॉलीवूड जॉन अब्राहमचा बहुचर्चित ‘सत्यमेव जयते २’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

जॉन अब्राहमचा बहुचर्चित ‘सत्यमेव जयते २’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटातील जॉनच्या भूमिकेच सर्वत्र कौतुक झाल होत. आता लवकरच ‘सत्यमेव जयते २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता जॉन अब्राहमने सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, जॉन अब्राहमचा बहुचर्चित ‘सत्यमेव जयते २’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी चित्रपट २६ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता, परंतु तारखेत बदल करून चित्रपट एक दिवस आधीच म्हणजे २५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून, खुद्द जॉन अब्राहमने याबाबत सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे.

इतकेच नव्हे तर जॉन अब्राहमने या चित्रपटाचा ट्रेलर कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार याचा सुद्धा खुलासा केला आहे. जॉन अब्राहमने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन चित्रपटाचे पोस्टर शेअर केले असून, यामध्ये जॉन शर्टलेस होऊन दोन लोकांना हातावर उचलून घेतलेले दिसत आहे. यामध्ये जॉनने पोलिसाची वर्दी घातली आहे तर त्याच्या पाठीमागे लोकांची गर्दी आणि अशोकचक्र सुद्धा दिसत आहे.

या व्हायरल पोस्टरमध्ये जॉन अब्राहम आपली पिळदार शरीरयष्टी दाखवताना दिसत आहे. या फोटोसोबतच जॉनने एक मजकूर लिहिला आहे ज्यामध्ये ” ‘सत्यमेव जयते २’ २५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. पुन्हा एकदा चित्रपटगृहात एक्शन आणि मनोरंजन पाहायला मिळेल. ‘सत्यमेव जयते 2’ चा ट्रेलर 25 ऑक्टोंबर रोजी प्रदर्शित होईल.”

तत्पूर्वी ‘सत्यमेव जयते २’ आणि सलमान खानचा ‘राधे’ चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याच्या बातमीने चाहते नाराज झाले होते. हे दोन्ही चित्रपट ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच २५ मे ला प्रदर्शित होणार होते. त्यामुळे ‘सत्यमेव जयते २’ आणि ‘राधे’ चित्रपटात संघर्ष होणार अशी चर्चा होती. परंतु ‘सत्यमेव जयते २’च्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलत हा चित्रपट २६ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्याचे ठरवले. त्यामुळे सलमानचा ‘राधे’ ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित झाला होता.

दरम्यान ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटात अन्याय आणि सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध दिलेल्या लढ्याची कहाणी रेखाटली आहे. जॉन अब्राहम सोबतच या चित्रपटात दिव्या खोसला कुमार, राजीव पिल्लई, साहिल वैद्य आणि अनुप सोनी प्रमुख भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे लेखन मिलाप जावरी यांनी केले असून टी सिरीज आणि एमी इंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

साध्याभोळ्या अंतराने वेस्टर्न ड्रेस परिधान करत लावले जोरदार ठुमके, चाहता म्हणाला, ‘विषय संपला’

अरे भारीच की! ‘बाहुबली’ चित्रपट येणार मराठी भाषेत, ‘हे’ दोन कलाकार देणार चित्रपटाला आवाज

यहुदी संस्कृतीची माहिती देणारा, भयपटांच्या अजून एक पाऊल पुढे जाणारा ‘डिबुक’ लवकरच होणार प्रदर्शित

हे देखील वाचा