Friday, April 19, 2024

अरे भारीच की! ‘बाहुबली’ चित्रपट येणार मराठी भाषेत, ‘हे’ दोन कलाकार देणार चित्रपटाला आवाज

चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट येतात आणि जातात, परंतु काही चित्रपट असे असतात जे प्रेक्षकांच्या मनावर त्यांचा ठसा सोडून जातात. यातील एक भव्यदिव्य चित्रपट, ज्याने सगळ्या चित्रपटाचे रेकॉर्ड तोडून टाकले होते. तो चित्रपट म्हणजे ‘बाहुबली’. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतले होते. चित्रपटातील डायलॉग, गाणी, पात्र, सीन्स या सगळ्यांनी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच वेड लावले. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. सगळ्यांनी चित्रपटाला खूप प्रेम दिले. अशातच मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ‘बाहुबली’ हा चित्रपट मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘बाहुबली’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे सीन सगळे तसेच असणार आहे परंतु चित्रपटाला मराठी भाषेत डब केले जाणार आहे. हाती आले माहितीनुसार या चित्रपट मुख्य भूमिकेत असणाऱ्या बाहुबली या पात्राला अभिनेता अमोल कोल्हे हा आवाज देणार आहे. तर देवसेना या पात्राला मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आवाज देणार आहे, तर या चित्रपटातील सगळी गाणी गायिका केतकी माटेगावकर ही गाणार आहे. (bahubali movie doub in marathi language, amol kolhe and sonalee kulkarni will give their voice to movie)

https://www.instagram.com/p/CVR8eZlqb_e/?utm_medium=copy_link

ही गोष्ट ऐकून मराठी ‘बाहुबली’ प्रेमींना खूप आनंद झाला आहे. आपल्या मराठी भाषेत हा चित्रपट येणार असल्याने सगळेच उत्साहात आहेत. अनेकजण कमेंट करून चित्रपट कधी येणार आहे, हे विचारत आहेत. तसेच अमोल कोल्हे आणि सोनाली कुलकर्णी हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार असल्याने त्यांचा आवाज एवढ्या मोठ्या चित्रपटाद्वारे ऐकायला मिळणार आहे, यामुळे सगळेच खुश आहेत.

‘बाहुबली’ या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रदर्शित झाला आहे. दोन्ही भागाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाचा ६५० कोटीपेक्षाही जास्त गल्ला झाला आहे. या चित्रपटात प्रभास, अनुष्का शेट्टी, तमन्ना हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मीरा जग्गनाथच्या अश्रूंचा फुटला बांध, गायत्री दातारला मिठी मारत मन केले मोकळे

-अभिनय क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘कलारंभ २’ या अनोख्या अभिनय प्रशिक्षण उपक्रमाची घोषणा 

-सुयश टिळक आणि आयुषी भावे यांचा विवाहसोहळा संपन्न, पारंपरिक पद्धतीने जोडी अडकली लग्नबंधनात

हे देखील वाचा