साध्याभोळ्या अंतराने वेस्टर्न ड्रेस परिधान करत लावले जोरदार ठुमके, चाहता म्हणाला, ‘विषय संपला’

कलर्स मराठी या वाहिनीवरील एका मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ही मालिका म्हणजे ‘जीव माझा गुंतला.’ मालिका पाहून आता प्रेक्षकांचाच या मालिकेत जीव गुंतला आहे. मालिकेची कहाणी वेगळी आणि प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारी आहे. त्यामुळे मालिका सगळ्यांना भावत आहे. मालिकेत एका सामान्य घरातील मुलीची कहाणी दाखवली आहे. घरात कोणताही पुरुष नसताना ही मुलगी कॉलेज करता करता घराची जबाबदारी घेते.

चार पैसे कमावता यावेत म्हणून ती रिक्षा चालवते. खरंतर महिला आजकाल कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत. प्रत्येक क्षेत्रात आज त्या कार्यरत आहेत. याचेच उदाहरण म्हणजे रिक्षाचालक. मालिकेत मुख्य भूमिकेत योगिता चव्हाण ही अभिनेत्री आहे. मालिकेत साध्या पोशाखात दिसणारी अंतरा वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच बोल्ड दिसते. अशातच तिचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे. (jeeva maza guntala fame yogita chavhan share her dance video on social media)

योगिताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘शरारा शरारा’ या गाण्यावर जोरदार ठुमके मारताना दिसत आहे. तिने पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि प्लाझो घातली आहे. तसेच सगळे केस मोकळे सोडले आहे. या गाण्यावर ती सुंदर पद्धतीने डान्स मूव्ह्स करत आहे. तिचा हा डान्स तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. दररोज साडीमध्ये बघणाऱ्या अंतराला या मॉर्डन ड्रेसमध्ये पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Yogita Chavan (@official_chavan_yogita)

अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तिच्या एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “वाट मोकळी करा अंतरा आलीये,” तर आणखी एका चाहत्याने “विषय संपला’ अशी कमेंट केली आहे. तर बाकी अनेकजण तिच्या या डान्सचे कौतुक करत आहेत.

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत सध्या खूप मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेत अनपेक्षितपणे अंतरा आणि मल्हारचे लग्न झाले आहे. त्यामुळे मालिकेत अंतराची असणारी हमसफर म्हणजेच तिची रिक्षा तिच्यापासून दुरावली होती. त्यामुळे ती खानविलकरांच्या घरात गेल्यावर अंतरा पुन्हा रिक्षा चालवून तिच्या कुटुंबाला कसा हातभार लावेल असा सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण नुकतेच अंतराने पुन्हा एकदा रिक्षा चालवण्याच्या निर्णय घेतला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अनन्या पांडे जगातील सर्वात मोठी मूर्ख’, म्हणत ‘या’ स्टारकिडला एनसीबी चौकशीला बोलावण्याचा कमाल खानचा दावा

-एनसीबीकडून आज पुन्हा होणार अनन्या पांडेची चौकशी

-अनन्या शाहरुख खानला म्हणाली होती ‘सेकंड डॅड’, नेमकं प्रकरण काय?

Latest Post