मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. ती नेहमीच तिच्या स्टाईलने आणि एका अनोख्या अंदाजाने सगळ्यांमध्ये चर्चेत असते. अत्यंत साध्या भोळ्या भूमिकांपासून ते अत्यंत बोल्ड आणि डॅशिंग भूमिकेपर्यंत तिने पात्रं निभावली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर तिचा एक वेगळाच ठसा उमटला आहे. सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच तिचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल माहिती देत असते. अशातच तिचे काही साडीमधील फोटो समोर आले आहेत.
सईने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या सुरुवातीच्या दोन फोटोंमध्ये तिने न्यूड कलरची साडी नेसली असून, यावर तिने गळ्यात केवळ एक मोठा हार घातला आहे. या लूकमध्ये ती खूपच गोड दिसत आहे. तसेच नंतरच्या फोटोमध्ये तिने चॉकलेटी रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे. तसेच ती फोटोमध्ये गर्ल गँगसोबत दिसत आहे. हे फोटो अभिनेता सुयश टिळक आणि आयुशी भावे यांच्या लग्नातील आहे. त्यांच्या लग्नात सईसोबत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. (Actress sai Tamhankar share her beautiful photo on social media)
तिच्या या फोटोवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोवर अमृता खानविलकर हिने कमेंट केली आहे की, “बेबी किती गोड यार,” तर श्रेया बुगडे हिने “मॅडम” अशी कमेंट केली आहे. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “लय दिसानी मन भरलं बगा, तुम्हास असं टापटीप बघून.” तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
सई ताम्हणकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘सनई चौघडे’ या चित्रपटांमधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. सोबत टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे तिने ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अग्निपरीक्षा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत खूप वेगाने भरारी घेतली.
तिने ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हे तिचे कमालीचे नाव कमावले आहे. तिने हिंदीमध्ये ‘हंटर’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने नुकतेच ‘मिमी’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम केले. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–साध्याभोळ्या अंतराने वेस्टर्न ड्रेस परिधान करत लावले जोरदार ठुमके, चाहता म्हणाला, ‘विषय संपला’
–अरे भारीच की! ‘बाहुबली’ चित्रपट येणार मराठी भाषेत, ‘हे’ दोन कलाकार देणार चित्रपटाला आवाज
–यहुदी संस्कृतीची माहिती देणारा, भयपटांच्या अजून एक पाऊल पुढे जाणारा ‘डिबुक’ लवकरच होणार प्रदर्शित










