दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण देशाला वेड लावणारा अभिनेता प्रभास होय. त्याने त्याच्या करिअरची सुरुवात तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमधून केली होती. सिनेसृष्टीत खूप मेहनत करून त्याने त्याचे नाव कमावले आहे. आज त्याचे चाहते केवळ देशातच नाही, तर परदेशात देखील पसरले आहेत. प्रभास याचा समावेश सिनेसृष्टीतील महागड्या कलाकारांमध्ये होतो.
तसं पाहायला गेलं, तर प्रभासने अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र, त्याच्या वाट्याला असा एक चित्रपट आला, ज्याने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. तो चित्रपट म्हणजे ‘बाहुबली’ होय. ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर भारतात क्वचितच असा एखादा व्यक्ती असेल, जो प्रभासला ओळखत नसेल. शनिवारी (23 ऑक्टोबर) प्रभास त्याचा43वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर यानिमित्त जाणून घेऊया त्याची एकूण संपत्ती… (Let’s know about Sauth star Prabhas’s networth in his birthday)
माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रभास २१५ कोटी संपत्तीचा मालक आहे. त्याच्या कमाईचा मोठा भाग हा ब्रँड एंडोर्समेंट आणि पर्सनल गुंतवणुकीमधून येतो. प्रभास सुरुवातीला साऊथ इंडियामध्ये ब्रँड एंडोर्स करायचा, परंतु जेव्हा ‘बाहुबली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर त्याची ब्रँड व्हॅल्यू खूप वाढली. तो आता अनेक ब्रँड एंडोर्स करतो.
हाती आलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या तीन वर्षातच प्रभासचे नेटवर्थ 65टक्क्यांनी वाढणार आहे. हा अंदाज त्याच्या जुन्या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि तेलुगू इंडस्ट्रीमध्ये वाढणारी त्याची डिमांड यावरून लावला गेला आहे.
प्रभासने त्याचे घर डिझाईन करून घेतलेले आहे. त्याचे घर हैद्राबादच्या प्राईम ठिकाणी स्थित आहे. त्याने २०१४ साली त्याचे हे आलिशान घर बनवले आहे. तसेच त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्याच्या या गाड्यांची किंमत जवळपास १ ते2कोटी एवढी आहे.
त्याच्या व्यावसायिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, त्याने 2002 साली तेलुगू चित्रपटसृष्टीतून त्याच्या करिअरला सुरुवात केली. सध्या त्याच्याकडे अनेक चित्रपट आहेत. तो अभिनेत्री पूजा हेगडेसोबत ‘राधे श्याम’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट 14 फेब्रुवारी, 2022रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच तो सैफ अली खान आणि क्रिती सेननसोबत ‘आदिपुरुष’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो रामाचे पात्र निभावताना दिसणार आहे. तसेच तो ‘सालार’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रुती हासन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘राधेश्याम’ चित्रपटाकडून पूर्ण झाल्या नाहीत प्रभासच्या चाहत्याच्या अपेक्षा, चाहत्याने उचलले आत्महत्येचे पाऊल
के प्रोजेक्ट’च्या सेटवर दीपिका करतेय नखरे,अडचणीत आला दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास










