Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘अरे बिचाऱ्या मुलांवर जरा दया दाखवा’, राखी सावंतचा आर्यन अन् अनन्याला पाठिंबा

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुखचा मुलगा आर्यन खान हा अं’मली पदार्थ सेवन आणि देवाण-घेवाण केल्याच्या आरोपाखाली मुंबईमधील आर्थर कारागृहात आहे. अशातच चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे हिची देखील नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) आर्यन खानसोबत अं’मली पदार्थांचे चॅटिंग केल्याबद्दल चौकशी करत आहेत. यातच बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत हिने एनसीबीला विनंती केली आहे की, या मुलांना माफ करा. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

राखी सावंतने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी म्हणत आहे की, “नमस्कार एनसीबी, तुम्ही लोक हे काय करत आहात? दिवाळीच्या आधीच दिवाळी साजरी करत आहात. दिवाळीचे मोठमोठे फटाके दिवाळी आधीच फोडत आहात. काय करत आहात तुम्ही, जरा तरी दया दाखवा. बिचारी मुलं आहेत. ते आता मेहनत करत आहेत. त्यांच्यावर जरा दया दाखवा. तुम्हाला आणखी देखील कामं आहेत. जगात अजून देखील माणसं आहेत की, मग त्यांना पकडा ना. दिवाळीच्या आधीच दिवाळी साजरी करत आहात. अशी कोणी दिवाळी साजरी करतं का? असा अन्याय का करत आहात तुम्ही. अरे मुलांवर जरा दया दाखवा.” (Actress rakhi sawant support Aryan Khan and ananya Panday and she request to NCB to forgive them)

या प्रकरणात एनसीबीने अनन्या पांडेची देखील कसून चौकशी केली आहे. अनन्या पांडेची शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) रोजी एनसीबी चौकशी केली. त्यावेळी अनन्या एनसीबी ऑफिसमध्ये थोडी उशिरा पोहोचली. यावेळी अधिकारी समीर वानखेडे यांनी तिची चांगलीच शाळा घेतली होती. त्यांनी अनन्याला ११ वाजता वेळ दिली होती, परंतु ती दुपारी २ वाजता पोहोचली.

यावेळी समीर वानखेडे अनन्याला खूप ओरडले आणि बोलले की, “तुम्हाला ११ वाजता बोलवले होते आणि तुम्ही आता आला आहात. अधिकारी काय तुमची वाट बघत नाही बसणार. हे तुमचे प्रोडक्शन हाऊस नाहीये हे सेंट्रल एजन्सीचे ऑफिस आहे. जी वेळ दिली आहे, त्याच वेळेत येत जावा.”

यासोबत तिच्या मोबाईल आणि लॅपटॉपसहित अन्य ७ इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी एनसीबीने जप्त केल्या आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, जर काही डिलीट झाले असेल किंवा केले असेल, तर ती माहिती पुन्हा मिळू शकते. या बाबत सोमवारी रिपोर्ट येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनन्या पांडेच्या अडचणीत वाढ; जुने चॅट रिट्रिव्ह करण्यासाठी एनसीबीने जप्त केल्या ‘या’ गोष्टी

-‘हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही’, कार्यालयात उशिरा पोहचल्यामुळे समीर वानखेडेंनी अनन्याला धरलं धारेवर

-गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे साराला पडले महागात, सोशल मीडियावर होतेय ट्रोल

हे देखील वाचा