मधुर आवाजाची मल्लिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुराधा पौडवाल या त्यांच्या काळातील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक आहेत. अनुराधा पौडवाल यांचा आवाज इतका जबरदस्त होता की, त्यांची तुलना लता मंगेशकर यांच्याशी केली जायची. मोठमोठे संगीत दिग्दर्शकही त्यांना त्यांच्या चित्रपटात गाण्यास सांगायचे. बॉलिवूडमध्येही त्यांनी एकापेक्षा एक गाणी गायली आहेत. त्या त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होत्या आणि आगामी काळात त्या संगीत विश्वावर राज्य करतील असा विश्वास होता. अनुराधा पौडवाल बुधवारी (27ऑक्टोबर) आपला 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
जेव्हा प्रसिद्ध संगीतकार ओपी नय्यर यांनी अनुराधा यांचे गाणे, ऐकले तेव्हा त्यांचा आवाज ऐकून ते थक्क झाले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, आता लता मंगेशकर यांचे युग संपले आहे. त्यांची जागा अनुराधा पौडवाल यांनी घेतली आहे. पण अनुराधा यांच्या एका निर्णयाने त्यांची संपूर्ण कारकीर्दच बदलून गेली. अनुराधा यांनी पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्या ‘अभिमान’ चित्रपटात गाणे गायले होते. या चित्रपटात त्यांनी एक श्लोक गायला जो खूप लोकप्रिय झाला होता. त्यांच्या आवाजात इतका गोडवा होता की, बॉलिवूडशिवाय भक्तिसंगीताचे लोकही त्यांच्याकडे येऊ लागले.
अनुराधा आपल्या करिअरमध्ये झपाट्याने प्रगती करत होत्या. असे म्हटले जाते की, प्रत्येक संगीतकाराला विश्वास होता की, त्या सर्वात मोठ्या गायिका होणार आहेत. टी-सीरिजचे मालक गुलशन यांनीही अनुराधा पौडवाल यांना या काळातील लता मंगेशकर बनवण्याचा निर्धार केला होता. अनुराधा पौडवाल यांनी टी-सीरिजसाठी अनेक गाणी गायली आहेत.
माध्यमांतील वृत्तानुसार, अनुराधा यांचे संगीतकार गुलशन कुमार यांच्याशी अफेअर होते, मात्र त्यांनी याबद्दल कधीच काही सांगितले नाही. त्यांनी बॉलीवूडमध्ये केवळ पार्श्वगायनच केले नाही, तर भजन गाऊनही खूप नाव कमावले आहे. अनुराधाच्या लग्नाबद्दल सांगायचे तर, त्यांचे लग्न अरुण पौडवाल यांच्याशी झाले होते. जे एसडी बर्मनचे सहाय्यक आणि स्वतः संगीतकार होते. अनुराधा यांना आदित्य आणि कविता पौडवाल ही दोन मुले आहेत. आदित्य आता या जगात नाही. अरुण पौडवाल यांच्या अकाली निधनानंतरच अनुराधा आणि गुलशन कुमार यांचे अफेअर होते असे म्हटले जाते.
1990 मध्ये पतीचे निधन झाले
अनुराधा यांच्या पतीचे 1990 मध्ये निधन झाले. पतीच्या निधनानंतर अनुराधा या पूर्णपणे तुटल्या होत्या. यानंतर त्यांनी सांगितले की, त्या फक्त टी-सीरिजसाठी गाणार आहेत. या निर्णयानंतर लोकांनी त्यांच्याकडे जाणे बंद केले आणि त्यांनी संगीताच्या जगापासून पाठ फिरवली. यानंतर बहुतेक अनुराधा पौडवाल यांनी भक्तिगीते गायला सुरुवात केली. अनुराधा पौडवाल म्हणायच्या की, त्यांना यातच आनंद मिळतो.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
कमाईत ‘केजीएफ’ला मागे टाकणाऱ्या ‘कांतारा’चे कौतुक केल्याशिवाय नाही राहू शकले रजनीकांत; व्हायरल झालं ट्वीट
सेटवर ‘हे’ टेलिव्हिजन कलाकार झाले वादाचे शिकार, शेवटी ‘या’ मालिकेपासून व्हावं लागलं दूर