Thursday, June 19, 2025
Home साऊथ सिनेमा कमाईत ‘केजीएफ’ला मागे टाकणाऱ्या ‘कांतारा’चे कौतुक केल्याशिवाय नाही राहू शकले रजनीकांत; व्हायरल झालं ट्वीट

कमाईत ‘केजीएफ’ला मागे टाकणाऱ्या ‘कांतारा’चे कौतुक केल्याशिवाय नाही राहू शकले रजनीकांत; व्हायरल झालं ट्वीट

कांतारा‘(Kantara) या चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये कोणताच दिग्गज अभिनेता नसताना ‘कांतारा’ सुपरहिट ठरला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट इतिहास रचतो आहे. हा चित्रपट पाहून कर्नाटक सरकारने राज्यातील वयाची 60 वर्षं ओलांडलेल्या सर्व ज्येष्ठ दैव नर्तकांना एक विशेष भत्ता देणार असल्याचंही जाहीर केलं आहे. या चित्रपटाला चाहते तसेच सिनेसृष्टीतील दिग्गजांनीही या चित्रपटाची कौतुक केले आहे.

नुकतंच सुपरस्टार रजनीकांत(Rajinikanth) यांनीदेखील या चित्रपटाचं आणि अभिनेता रिषभ शेट्टीचं कौतुक केलं. ट्विटरच्या माध्यमातून रजनीकांत यांनी चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रजनीकांत यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘ही अशी गोष्ट आजवर कुणीच चित्रपटाच्या माध्यमातून तेवढ्या प्रभावीपणे सांगितली नाहीये. कांतारा बघताना माझ्या अंगावर रोमांच उभा राहत होता. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून तुला सलाम. भारतीय चित्रपटसृष्टीतील या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व कलाकार आणि टीमचे अभिनंदन.” रजनीकांतचे हे ट्विट व्हायरल होत आहे. या चित्रपटाला केवळ सेलिब्रिटींकडूनच प्रशंसा मिळत नाही तर त्याने चांगली कमाईही केली आहे. माध्यमाच्या वृत्तानुसार, चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ‘केजीएफ’ला मागे टाकले आहे.

या चित्रपटाने हिंदी भाषिक प्रदेशांमध्येही आपली उत्कृष्ट धावपळ सुरू ठेवली आणि दुसऱ्या आठवड्यात २६.५० कोटी रुपयांची कमाई केली. ‘कांतारा’ने पहिल्या दिवशी 1.27 कोटींची कमाई करत हिंदी मार्केटमध्ये चांगली ओपनिंग केली. दुसऱ्या दिवशी त्याची कमाई 2.75 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 3.5 कोटी रुपये होती. आता मंगळवारच्या रेकॉर्डनुसार या चित्रपटाने 2.35 कोटींची कमाई केली आहे. ‘कांतारा’ची लोकप्रियता एवढी वाढली आहे की याचा दूसरा भाग काढण्याची मागणी होताना दिसत आहे. ‘कांतारा’ हा कन्नड सिनेसृष्टीतील अत्यंत महत्त्वाचा सिनेमा बनला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सेटवर ‘हे’ टेलिव्हिजन कलाकार झाले वादाचे शिकार, शेवटी ‘या’ मालिकेपासून व्हावं लागलं दूर

‘भाईजान’ची फिटनेस पाहून व्हाल थक्क; चाहते म्हणाले, ‘हँडसम जान’

हे देखील वाचा