Tuesday, July 23, 2024

सेटवर ‘हे’ टेलिव्हिजन कलाकार झाले वादाचे शिकार, शेवटी ‘या’ मालिकेपासून व्हावं लागलं दूर

टेलिव्हिजन हे असेच एक माध्यम आहे ज्याद्वारे छोट्या पडद्यावरील कलाकार प्रत्येकाच्या घराघरात पोहचतात. हे स्टार्स आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर करतात. त्याचवेळी, काही कलाकार असे आहेत जे त्यांनी साकारलेल्या पात्रामुळे इतके लोकप्रिय होतात की लोक त्यांना खऱ्या नावाऐवजी पात्राच्या नावाने ओळखतात. पण काही कलाकाराना प्रोडक्शन टीम, निर्माते किंवा अगदी क्रिएटिव्ह टीमसोबतच्या मतभेदांमुळे शो सोडावा लागला आहे. चला तर मग जाणून घेऊया जे सेटवर वादाचे शिकार झाले आणि शेवटी त्यांना त्यांच्या सीरियलपासून दूर व्हावे लागले.

नेहा मेहता
मेहता का उल्टा चष्मामध्ये अंजलीची भूमिका साकारणाऱ्या नेहा मेहता(Neha Mehta) हिने 12 वर्षांनंतर शोपासून दुरावले होते. नेहा मेहता म्हणाली होती की, तिचे प्रोडक्शन टीमसोबत काही मतभेद होते, त्यानंतर तिने शो सोडणे योग्य मानले. त्याचवेळी, नेहा मेहताने निर्मात्यांवर तिची सहा महिन्यांची न देण्याचा आरोप लावला होता. पण हे आरोप प्रॉडक्शन हाऊसने खोटे असल्याचे सांगितले आणि नेहाशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने औपचारिकता पूर्ण केलेली नाही.

शिल्पा शिंदे
‘भाभी जी घर पर हैं’मध्ये अंगूरी भाभीच्या भूमिकेत प्रसिद्ध झालेल्या शिल्पा शिंदे(Shilpa Shinde) हिने निर्मात्यांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केल्यानंतर तिने शो सोडला होता. याशिवाय शिल्पाने सांगितले की, सहकलाकार सौम्या टंडनच्या गरजांची अधिक काळजी घेतली जात होती आणि या सर्व कारणांमुळे तिने शो सोडला. यानंतर निर्मात्यांनी शिल्पाला करार मोडल्याबद्दल नोटीसही बजावली होती. त्याचवेळी शिल्पाने प्रीमियरपूर्वी गँग्स ऑफ फिल्मिस्तान हा शो देखील सोडला. ती म्हणाला की, प्रोडक्शन टीमने सुरक्षा प्रोटोकॉलची काळजी घेतली नाही आणि त्याच्यावर कलाकारांचे शोषण केल्याचा आरोपही केला. मात्र क्रिएटिव्ह प्रोड्युसरने शिल्पाचे आरोप फेटाळून लावले होते.

हिना खान
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून करिअरची सुरुवात करणाऱ्या हिना खानने अक्षरा या व्यक्तिरेखेने खूप लोकप्रियता मिळवली आहे. जेव्हा या शोने 3000 भाग पूर्ण केले तेव्हा हिना खान आणि करण मेहराला त्याच्या यशाचे श्रेय दिले गेले नाही, त्यानंतर दोघांनीही शो सोडल्याच्या बातम्या चर्चेत आल्या. त्याचवेळी हिना खान आणि राजन शाही यांच्यात वाद सुरू असल्याचे बोलले जात होते. टँट्रम क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिनाला तिच्या अव्यावसायिक वर्तनामुळे शोमधून बाहेर काढण्यात आले. पण एका मुलाखतीत हिना म्हणाली होती की, तिला स्वतःला एक्सप्लोर करायचे आहे आणि म्हणूनच तिने शो सोडला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘भाईजान’ची फिटनेस पाहून व्हाल थक्क; चाहते म्हणाले, ‘हँडसम जान’

सोनेरी लेहेंगात केतकीचा खास लूक

हे देखील वाचा