क्रूझ अं’मली पदार्थ प्रकरणात आर्थर रोड कारागृहात बंद असलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीनाची याचिका गुरुवारी (२८ ऑक्टोबर) हायकोर्टाने मंजूर केली आहे. तब्बल २६ दिवसांनी आर्यनची सुटका झाल्यामुळे खान परिवार खूप आनंदात आहे. त्याची सुटका झाल्यावर अनेकजण सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहे. अशातच आर्यन खानची बहीण सुहाना खान हिने देखील भाऊ सुटल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
सुहानाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर आर्यनसोबतच्या फोटोंचा एक कोलाज शेअर केला आहे. यामध्ये तिने त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, सुहाना आणि आर्यन शाहरुख खानसोबत खेळताना दिसत आहेत. यावेळी सुहाना आणि आर्यन काही वेगळेच हावभाव देताना दिसत आहे. शाहरुख देखील त्याच्या मुलांसोबत खेळताना खूप खुश दिसत आहे. (Suhana khan share a childhood photos with Aryan and shahrukh khan after getting bail to Aryan Khan)
हे फोटो शेअर करून सुहानाने एक कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिले आहे की, ती तिच्या वडिलांवर आणि भावावर खूप प्रेम करते. सुहानाने “आय लव्ह यू” असे लिहिले आहे. शाहरुखसोबत आर्यन आणि सुहाना देखील या फोटोमध्ये खूप खुश दिसत आहे.
शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिने देखील आर्यन खानच्या जामीनानंतर एक पोस्ट शेअर केली होती. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला लिहिले होते की, “देव आहे, तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना आणि आशीर्वादासाठी धन्यवाद, नेहमीच सत्याचा विजय होतो.”
या केसमध्ये आर्यन खानसोबत मुंबई हायकोर्टाने अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना देखील जामीन दिला आहे. तर शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) कोर्ट त्यांचा विस्तृत आदेश देणार आहे. या सगळ्यांच्या कोर्टाचा आदेश मिळण्याची कॉपी मिळाल्यानंतरच त्यांना जेलमधून बाहेर काढणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यनला जामीन मंजूर, ‘मन्नत’वर साजरी होणार दिवाळी
-आर्यन खानला अटक झाल्यापासून ते जामीन मिळेपर्यंत काय काय घडलं? एका क्लिकवर घ्या जाणून
-आर्यनला जामीन न मिळाल्यामुळे ऋतिकने पुन्हा दर्शवला होता पाठिंबा; म्हणाला, ‘हे सर्व अत्यंत…’