Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

ठरलं तर! ‘या’ दिवशी लग्नबंधनात अडकणार अंकिता लोखंडे आणि विकी जैन

बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावर सध्या लग्नसराईचा सीझन झाला सुरू आहे. कॅटरिना कैफ-विकी कौशल आणि आलिया भट्ट-रणबीर कपूर या वर्षीच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी छोट्या पडद्यावरील अंकिता लोखंडे लवकरच तिचा प्रियकर विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

लग्नाची आहे जोरदार चर्चा सुरू
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील काही जोडप्यांची नावे समोर आली आहेत, जे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकू शकतात. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. अंकिता डिसेंबरमध्ये तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

लग्नाची तारीख आली समोर
माध्यमांतील वृत्तानुसार, अंकिता आणि विकी जैन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अंकिता आणि विकी १२ ते १४ डिसेंबर दरम्यान लग्नबंधनात अडकणार आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. अंकिता आणि विकीच्या त्यांच्या लग्नाची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे.

अंकिता विकी झाले रोमँटिक
नुकताच अंकिता आणि विकीचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. अंकिताने दिवाळी पार्टीत लाल रंगाची साडी परिधान केली होती. यासोबत तिने गळ्यात नेकलेस घातला आणि केसांचा बन बनवला. अंकिता यात खूपच सुंदर दिसत होती. दुसरीकडे, विकी ब्लॅक फॉर्मल्समध्ये सुंदर दिसत आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये त्यांचा रोमँटिक अंदाज दाखवण्यात आला असून, दोघे एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

दिसणार ‘पवित्र रिश्ता २’ मध्ये
यासोबतच आणखी एका व्हिडिओमध्ये अंकिता तिच्या मैत्रिणींसोबत ‘नशे सी चड गई’ आणि ‘बचपन का प्यार’ या गाण्यांवर लिपसिंक करताना दिसत आहे. अंकिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा बॉयफ्रेंडसोबत पोस्ट शेअर करत असते. अंकिता लोखंडे सध्या ‘पवित्र रिश्ता २’ मध्ये खूप व्यस्त आहे. या शोमध्ये ती ‘अर्चना’च्या भूमिकेत दिसत असून, अभिनेता शाहीर शेख सुशांत सिंग राजपूतच्या जागी ‘मानव’ची भूमिका साकारत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ विजेत्या दिव्याने केला बॉयफ्रेंड वरुणसोबतच्या वेडिंग प्लॅनचा खुलासा, म्हणाली…

-‘मला दिव्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले’, नेहाच्या वक्तव्यावर विजेतीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

-‘बिग बॉस ओटीटी’चा किताब जिंकून घरी परतली दिव्या; बॉयफ्रेंड वरुणने खास अंदाजात केले स्वागत

हे देखील वाचा