Sunday, May 19, 2024

‘बिग बॉस ओटीटी’ विजेत्या दिव्याने केला बॉयफ्रेंड वरुणसोबतच्या वेडिंग प्लॅनचा खुलासा, म्हणाली…

टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध आणि वादग्रस्त शोपैकी एक म्हणजे ‘बिग बॉस’ होय. या शोच्या लोकप्रियतेचा अंदाज आपण यावरूनच लावू शकतो की, हा शोचा विविध भाषेतही पाहायला मिळतो. विशेष म्हणजे नुकतेच या शोचे ओटीटी पहिले पर्व संपले. ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो प्रेक्षक २४ तास थेट पाहू शकत होते. यामध्ये दिव्या अग्रवाल, प्रतीक सेहजपाल, शमिता शेट्टी, निशांत भट्ट आणि राकेश बापट या शोचे अंतिम स्पर्धक होते. या पर्वाची विजेती दिव्या अग्रवाल ठरली. दुसरीकडे निशांत भट्ट पहिला रनरअप आणि शमिता शेट्टी दुसरी रनरअप ठरली होती. राकेश बापट चौथ्या क्रमांकावर पोहोचला होता. दिव्या अग्रवालने हा शो जिंकणे तिच्या चाहत्यांसाठी एका ट्रीटपेक्षा कमी नव्हते.

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात दिव्या ही एकमेव स्पर्धक होती, जी कनेक्शन नसतानाही पुढे गेली. मात्र, दिव्याचे रिअल लाईफ कनेक्शन खूप मजबूत आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये वरुण सूद दिसला होता. जेव्हा तो शोमध्ये दिव्याला भेटायला आला होता, तेव्हा ती भावुक झाली होती. चाहत्यांना दिव्या आणि वरुणची जोडी खूप आवडते.

नुकतेच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, दिव्याने वरुणसोबतच्या तिच्या लग्नाची योजना उघड केली आहे. दिव्याने म्हटले आहे की, लग्न करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि आम्ही ही गोष्ट दोघेही हे चांगल्याप्रकारे समजतो.”

दिव्या म्हणाली की, “मी या प्रश्नाचे उत्तर देण्यापासून अजिबात पळून जात नाही. आम्ही लवकरच लग्नगाठ बांधू. त्यानंतर आम्ही दोघेही आमच्या आयुष्याची तयारी करू. ही एक मोठी जबाबदारी आहे, ज्याबद्दल आपल्याला कुटुंब आणि करिअर लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागतो. आतापर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही, पण जेव्हा ते होईल, तेव्हा ते धुमधडाक्यात असेल.”

बऱ्याच दिवसानंतर वरुण सूदला भेटल्यानंतर दिव्या म्हणाली की, “आमच्यात आजपर्यंत कोणतेही मॅटर झाले नाही, आम्ही दोघेही खूप जिद्दी आहोत आणि आम्ही एकमेकांना सोडणार नाही.”

‘बिग बॉस ओटीटी’ विजेती बनल्यानंतर दिव्या चांगलीच चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सनी आणि बॉबी या सावत्र मुलांसोबत कसे आहे हेमा मालिनी यांचे नाते, स्वतः ड्रीमगर्लनेच केला होता खुलासा

अखेर प्रतीक्षा संपली! अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित सूर्यवंशी ‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये करणार धमाका

नुसरत जहाँ अन् यश दासगुप्ताने गुपचूप उरकलंय लग्न? पुन्हा दिली अभिनेत्रीने ‘हिंट’

हे देखील वाचा