Monday, February 2, 2026
Home बॉलीवूड मॉडेल, होस्ट, नंतर अभिनेत्री; ‘असा’ आहे रोशनी चोप्राचा अभिनय सृष्टीतील प्रवास

मॉडेल, होस्ट, नंतर अभिनेत्री; ‘असा’ आहे रोशनी चोप्राचा अभिनय सृष्टीतील प्रवास

अनेकवेळा असा समज असतो की, चित्रपटात काम केल्यानेच कलाकार प्रसिद्ध आणि लोकप्रिय होतात. परंतु आज अनेक टेलिव्हिजन कलाकार असे आहेत, जे लोकप्रियतेच्या बाबतीत बॉलिवूड कलाकारांना मागे टाकतात. यातीलच एक नाव म्हणजे टीव्ही अभिनेत्री रोशनी चोप्रा. ‘कसम से’ या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या रोशनीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे आणि खास स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत तिचासोबत राम कपूर आणि प्राची देसाई हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत होते. रोशनी मंगळवारी (२ नोव्हेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी.

रोशनीचा जन्म २ नोव्हेंबर १९८० मध्ये दिल्ली येथे झाला आहे. एक अभिनेत्री होण्यासोबत ती एक सूत्रसंचालिका देखील आहे. तसेच ती मॉडेलिंग देखील करते. (Birthday special : let’s know about actress Roshni Chopra)

रोशनी चोप्राचे शिक्षण दुबईमध्ये पूर्ण झाले आहे. तिच्या करिअरबाबत बोलायचे झाल्यास, तिने २००४मध्ये ‘लेट्स एन्जॉय’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. तिने अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच रियॅलिटी शोचे सूत्रसंचालन देखील केले आहे. या दोन्हीही भूमिकेत तिच्या चाहत्यांनी तिला खूप पसंती दर्शवली.

रोशनी चोप्राने विक्रम भट्ट यांच्या ‘फिर’ या चित्रपटात देखील काम केले आहे. हा चित्रपट १२ ऑगस्ट २०२१ रोजी प्रदर्शित झाला होता. तिने २००९-२०१० पर्यंत सोनी टीव्हीवरील ‘कॉमेडी सर्कस तीन का तडका’ हा शो होस्ट केला आहे. यासोबत तिने ‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ या शोमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘प्यार मैं ट्विस्ट’ या मालिकेत देखील काम केले आहे.

रोशनी चोप्राने २००६ साली चित्रपट निर्माता सिद्धार्थ आनंद कुमार याच्याशी केले केले आहे. त्या दोघांनी दोन मुले आहेत. अनेकवेळा ती सोशल मीडियावर तिच्या कुटंबासोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर आहे आणि तिचा व्यवसाय सांभाळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पदार्पणातच पटकावला होता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, ‘या’ कारणामुळे ईशा देओलने अभिनयाला केले स्वतः पासून लांब

-सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आलिया भट्टच्या डुप्लिकेटचे व्हिडिओ तुम्हीही पाहिले तर म्हणाल कार्बन कॉपी

-Photo: गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत अरबाज झाला रोमँटिक; कपलच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

हे देखील वाचा