टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक असलेला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो मागील १३ वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षक या शोमधील प्रत्येक पात्राचे चाहते आहेत. त्याचे एक विशेष कारण म्हणजे या शोमध्ये प्रत्येक पात्र त्यांची भूमिका इतकी प्रभावी आणि सुंदरपणे निभावतात. सर्व वयोगटातील प्रेक्षक हा शो आवडीने पाहतात. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शोमध्ये ‘दयाबेन’ अर्थात दिशा वाकानीची व्यक्तिरेखा सर्वाधिक पसंत केली जाते. मागील काही वर्षांपासून ती या शोपासून दूर आहे. असे असूनही आजही तिच्या लोकप्रियतेत अजिबात फरक पडलेला नाही. दिशाने जेवढी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली तेवढीच तिने संपत्ती देखील मिळवली आहे. आज आपण तिच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत. जी ऐकून तुम्ही हैराण व्हाल.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत आपल्या हटके आवाजाने, हटके गरबा डान्स स्टाईलने प्रसिद्ध झालेली दिशा पुन्हा शोमध्ये परतेल या आशेवर प्रेक्षक आहेत. मागील अनेक वर्षांपासून मनोरन्जनविश्वात सक्रिय असणाऱ्या दिशाने तिच्या प्रतिभेच्या जोरावर या क्षेत्रात तिचे मोठे नाव कमावले आहे. दयाबेन उर्फ दिशा वाकानीच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊया. बऱ्याच दिवसांपासून शोपासून दूर असलेल्या दयाबेनच्या संपत्तीबद्दल जाणून घेतल्यास तुम्हीही नक्कीच ‘हे माँ माता जी’ म्हणाल.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची दयाबेन या भूमिकेने तिने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. तिचा प्रत्येक डायलॉग आजही चाहत्यांना आठवतो. दयाबेन मालिकेत नसल्याने नक्कीच तिची उणीव मालिका बघताना जाणवत असते. जरी दिशा सध्या काम करत नसली तरी तिने आधी काम करून बरीच संपत्ती जमा केली आहे. दिशा ही करोडोंच्या संपत्तीची मालकिन आहे. तिची एकूण संपत्ती जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
माध्यमांतील वृत्तानुसार, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या एका एपिसोडसाठी दयाबेनला एक ते दीड लाख रुपये मानधन देण्यात येत होते. यामुळे २०१७ पर्यंत तिला दर महिन्याला २० लाख रुपये मिळत होते. दयाबेनची एकूण संपत्ती तब्बल ३७ कोटी रुपयांची आहे. याशिवाय तिच्याकडे बीएमडब्ल्यू कारही आहे.
टीव्ही प्रेक्षकांमध्ये दिशा वाकानीच्या वाढत्या लोकप्रियतेदरम्यान तिला अनेक टीव्हीसीएस आणि ब्रँड्स देखील मिळत होते. दिशा वाकानीने ड्रॅमॅटिक आर्ट्सचे शिक्षण घेतले आहे. तिने २०१५ मध्ये मयूर पारीखशी लग्न केले. नोव्हेंबर २०१७ मध्ये तिला मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर तिने काही काळ शोमधून ब्रेक घेतला मात्र अजूनही ती शोमध्ये परतली नाहीये.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर दिशा वाकानीने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती ‘देवदास’, ‘मंगल पांडे: द रायजिंग’, ‘जोधा अकबर’, ‘सी कंपनी’, ‘लव्ह स्टोरी २०५०’ मध्येही दिसली आहे. मात्र तिला खरी ओळख आणि लोकप्रियता तिला याच मालिकेने दिली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा
-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो
-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा