Sunday, May 19, 2024

‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

भारतात अनेक सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होत असतात. अशातच भारतात सर्वत्र दीपावली हा सण साजरा केला जात आहे. दिव्यांच्या प्रकाशात उजळून टाकणारा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. पुरातन काळातील कथेनुसार यावेळी प्रभू श्रीराम त्यांचा १४ वर्षाचा वनवास संपवून आयोध्येत परत आले होते. त्यावेळी सर्वांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण आयोध्या दिव्यांच्या प्रकाशात चमकवली होती. तेव्हापासून सर्वत्र दिव्यांच्या प्रकाशात सर्वांना प्रकाशमान करणारा हा सण दीपावली म्हणून साजरा केला जातो. सणानिमित्त अनेक कलाकार दीपावलीच्या शुभेच्छा देत आहेत. (Marathi actors give best wishes of diwali on social media)

नुकतेच लग्नबंधनात अडकलेली रसिका सुनील हिने सोशल मीडियावर लग्नानंतरचा पहिला फोटो शेअर करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये तिने चॉकलेटी रंगाची साडी घातली आहे. तसेच गळ्यात छोटेसे मंगळसूत्र घातलेले दिसत आहे.

अभिनेत्री सायली संजीव हिने देखील सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने केशरी रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज घातला असून, या लूकमध्ये ती फार गोड दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मयुरी देशमुख हिने इंस्टाग्रामवर तिचे निळ्या रंगाच्या साडीमधील काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिच्या आजूबाजूला दिव्यांची रोषणाई दिसत आहे. हे फोटो शेअर करून तिने प्रेक्षकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सगळ्यांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने सोशल मीडियावर तिचे काही पारंपारिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती रांगोळी शेजारी बसलेली आहे. हे फोटो शेअर करून तिने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वीच लग्न बंधनात अडकेली मिताली मयेकर ही लग्नानंतरची पहिलीच दिवाळी साजरी करत आहे. तिने देखील चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने लाल रंगाची अत्यंत सुंदर साडी नेसली आहे. हा फोटो शेअर करून तिने “लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया” असे कॅप्शन दिले आहे.

गायिका सावणी रवींद्र हिने देखील पारंपारिक वेशात फोटो शेअर करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत
तिने पिवळ्या रंगाची साडी नेसून सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती नेहमी प्रमाणेच अत्यंत सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करून तिने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बिग बॉस फेम स्मिता गोंदकर फेम हिने देखील सोशल मीडियावर तिचे अत्यंत सुंदर फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या साडी लूकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.

अशाप्रकारे अनेक कलाकार त्यांचे दिवाळीचे फोटो शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

तब्बूला पाहून जेव्हा ‘या’ अभिनेत्याचा सुटला स्वतःवरचा ताबा, आजही तिच्या आठवणीत आहे ‘तो’ किस्सा

तर ‘अशा’ पद्धतीने घातली विकी कौशलने कॅटरिना कैफला लग्नाची मागणी

लग्नानंतर साजऱ्या होणाऱ्या पहिल्या दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीने केली खास तयारी शेअर केला व्हिडिओ

हे देखील वाचा