Sunday, May 19, 2024

रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

रितेश देशमुख आणि जिनेलिया डिसूझा-देशमुख म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात गोड आणि आनंदी जोडप्यांपैकी एक. अनेकदा त्यांना महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी असेही म्हणतात. बॉलिवूडमधील ही क्यूट जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. हे दोघेही जेव्हा एकमेकांसोबत वेळ घालवतात, तेव्हाचे अनेक विनोदी व्हिडिओ ते चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. आताही दिवाळी निमित्ताने शुभेच्छा देत असताना त्यांनी एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे.

आपल्या भारतात सण-उत्सव, रूढी-परंपरा याला खूप महत्त्व दिले जाते. सणवार आले की, सर्वजण आपापल्या परीने ते जल्लोषात साजरे करतात. यापैकीच दिवाळी हा सण देशात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्वसामान्यांपासून ते अगदी कलाकारांपर्यंत सर्वजण दिवाळीसाठी खुपच उत्सुक असतात.

कलाकार मंडळी दिवाळीत त्यांच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असतात. अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनेलिया यांचाही असाच व्हिडिओ सध्या समोर आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

रितेश आणि जिनेलिया या जोडीने यंदा त्यांच्या प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण, यावेळी त्यांनी एकट्याने नाही तर, त्यांच्या मुलांसोबत एक व्हिडिओ शूट करत या शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो, त्याची पत्नी आणि मुले डान्स करत आहेत. आणि एकत्रित ‘हॅप्पी दिवाली’ गाणे गात आहेत.

रितेशने या व्हिडिओबाबत लिहिले आहे की, “आमच्या कुटुंबाकडून तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या शुभेच्छा.” सदर व्हिडिओत रितेशने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर जिनेलियाने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली असून, त्यावर रंगीबेरंगी ब्लाऊज परिधान केला आहे.

हे देखील वाचा