देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मराठी सणांपैकी दिवाळी हा सण सर्वात मोठा आणि महत्वाचा मानला जातो. दिवाळी यायची म्हटले की, सर्वजण काहीना काही खरेदी करत असतात. ही गोष्ट केवळ सामान्य माणसापुरती मर्यादित नाही, तर अनेक मोठमोठे कलाकार देखील दिवाळीसाठी खरेदी करत असतात. त्याचबरोबर साडे तीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा मुहूर्त हा दिवाळीत असतो. या कारणामुळे देखील अनेक लोक दिवाळीचे लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या पाडव्यादिवशी मोठमोठ्या वस्तू खरेदी करतात. अशातच आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शोमधील जेठालालने म्हणजेच दिलीप जोशी यांनी नवीन कार खरेदी केली आहे.
टेलिव्हिजन, चित्रपट आणि थिएटरमधील मल्टी-टॅलेंटसाठी ओळखले जाणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी ‘किया सोनेट सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही’ घरी आणली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांनी त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या नवीन कारची डिलिव्हरी घेतली. दिलीप जोशी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील जेठालाल चंपकलाल गडा या पात्रासाठी प्रसिद्ध आहेत.
दरम्यान, किया सॉनेट अत्यंत लोकप्रिय गाडी असून, सेल्टोस नंतर किया इंडियाचे दुसरे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. हे मॉडेल त्याच्या स्पोर्टी डिझाइनसह, बाकी अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. या कारणांमध्ये वेगवान पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह, सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही १.२-लीटर नॅच्युरल-अॅस्पिरेटेड पेट्रोल, १.०-लीटर टर्बो पेट्रोल आणि १.५-लीटर डिझेल इंजिन पर्यायांमधून पॉवर मिळवते. ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये ५-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड आयएमटी, ७-स्पीड डीसीटी आणि टॉर्क कन्व्हर्टर यांचा समावेश आहे. किया सोनेट ही त्याच्या विभागातील एकमेव ऑफर आहे जी डिझेल ऑटोमॅटिक ऑप्शन ऑफर करते. दिलीप जोशी यांनी खरेदी केलेली किया कारची किंमत रु. १२.२९ लाख पासून सुरू होते.
दिलीप जोशी यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांना ‘जेठालाल’ या भूमिकेने अमाप लोकप्रियता मिळवून दिली. याआधी दिलीप जोशी यांनी अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा
-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो
-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा