अभिनेते कमल हासन त्यांच्या अभिनयामुळे आज संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. लहानपणापासूनच त्यांचे चित्रपटसृष्टीशी नाते आहे. बालवयातच त्यांनी अभिनय करून अनेकांच्या मनात त्यांच्यासाठी जागा निर्माण केली आहे. सोमवार (7 नोव्हेंबर) कमल हासन त्यांचा 68 वा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया त्यांच्याबाबत काही खास गोष्टी.
कमल यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1954 साली झाला. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एक बालकलाकार म्हणून केली होती. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी जेमिनी गणेशन आणि सावित्री यांच्या 1960 मध्ये आलेला ‘कलाथुर कन्नम्मा’ या चित्रपटात काम केले होते. त्यांचा हा चित्रपट खूप गाजला होता. त्यांना या चित्रपटातून केवळ ओळख नाही मिळाली, तर तामिळ भाषेतील बेस्ट फिचर चित्रपटासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला. तसेच यासाठी कमल हासन यांना प्रेसिडंट गोल्ड मेडलने सन्मानित केले होते. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
कमल हासन यांनी केवळ अभिनय नाही केला, तर स्क्रिप्ट रायटिंग, दिग्दर्शन, डान्स आणि संगीतात देखील त्यांचे योगदान दिले आहे. त्यांनी तमिळमधील ‘बिग बॉस’ हा शो होस्ट केला आहे. ते तमिळ इंडस्ट्रीमधील एक महान नायक आहे. त्यांनी २०१९ मध्ये भारतीय सिनेसृष्टीत ६० वर्ष पूर्ण केले आहेत. या दरम्यान त्यांनी खूप संपत्ती मिळवली आहे. माध्यमातील वृत्तानुसार कमल हासन यांच्याकडे ६८८.८४ कोटीची प्रॉपर्टी आहे.
माध्यमातील वृत्तानुसार कमल हासन पहिले भारतीय अभिनेते असतील, ज्यांना १९९४ मध्ये १ कोटी रुपये फी मिळाली आहे. ते प्रत्येक चित्रपटासाठी ३० कोटीपेक्षाही जास्त रुपये चार्ज करतात. ‘बिग बॉस तमिळ ५’ साठी त्यांनी ५५ कोटी रुपये फी घेतली होती. ते निवेश, ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रोडक्शनमधून देखील खूप कमवतात. ते आता राजकारणात उतरले आहेत.
कमल हासन यांनी ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. यानंतर त्यांनी ‘सागर’, ‘गिरफ्तार’, ‘जरा सी जिंदगी’, ‘राज तिलक’, ‘एक नई पहेली’, ‘चाची ४२०’, ‘हे राम’ अशा अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी अभिनय केला. त्यांचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिले आहे.
कमल हासन यांचे ७० च्या दशकात श्रीविद्यासोबत अफेअर होते. त्यांनी एकत्र चित्रपटात काम देखील केले. परंतु त्यांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. त्यानंतर १९७८ साली त्यांनी वाणी गणपतीसोबत लग्न केले. त्यांचे लग्न १० वर्ष टिकले आणि १९८८ मध्ये ते विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटाचे कारण होते सारिका. त्यांचे आणि सारिकाचे अफेअर चालू होते. वाणीसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी १९८८ मध्येच सारिकाशी विवाह केला. त्यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली आहेत. परंतु २००४ मध्ये ते दोघे देखील वेगळे झाले. त्यांची मुलगी श्रुती हसन देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटात काम करून तिचे नाव कमावले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नागार्जुन- तब्बूपासून ते अनुष्का- प्रभासपर्यंत, टॉलिवूडचे ‘हे’ 5 अफेअर्स होते भलतेच चर्चेत, पाहा यादी
‘या’ व्यक्तीच्या भेटीनंतर बदलले अनुष्का शेट्टीचे आयुष्य, प्रभाससोबत असणाऱ्या नात्यामुळे नेहमीच असते चर्चेत