Monday, March 4, 2024

‘या’ व्यक्तीच्या भेटीनंतर बदलले अनुष्का शेट्टीचे आयुष्य, प्रभाससोबत असणाऱ्या नात्यामुळे नेहमीच असते चर्चेत

अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘बाहुबली’ चित्रपटानंतर तिला संपूर्ण भारतात ओळख मिळाली. चित्रपटातील तिचे देवसेना नावाचे पात्र सगळ्यांना खूप आवडले होते. ती आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे. साेमवारी (7 नोव्हेंबर) अनुष्का तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी.

अनुष्का शेट्टीचा जन्म 7 नोव्हेंबर 1981 मध्ये कर्नाटकमध्ये झाला. लहान असताना तिच्या आई वडिलांनी प्रेमाने तिचे नाव स्वीटी असे ठेवले होते. अनुष्का साऊथमध्ये चित्रपटात काम करण्यासोबतच एक योगा कंस्ट्रक्टर म्हणून देखील काम करत होती. कॉलेजमध्ये असताना ती मेडिटेशन वर्कशॉपमध्ये देखील भाग घेत असायची. यावेळी ती योगाचे क्लास घ्यायची. अनुष्काच्या कुटुंबात सगळेच डॉक्टर आणि इंजिनिअर्स आहेत. परंतु तिने वेगळा मार्ग निवडला. तिने तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अध्यापन देखील केले. तिच्या आयुष्यात ती त्यावेळी एकदम खुश होती. परंतु अचानक तिची भेट दिग्दर्शक मेहर रमेश आणि पुरी जगन यांच्याशी झाली आणि तेथूनच तिचे आयुष्य बदलले. (anushka shetty birthday special : lets know about her life)

अनुष्काने तिच्या करिअरच्या सुरुवातीला हा विचार देखील केला नव्हता की, ती पुढे जाऊन एक अभिनेत्री बनेल. तिने 2005 साली तिच्या अभिनयातील करिअरला सुरुवात केली. तिने तेलुगू चित्रपट ‘सुपर’मध्ये काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत सुपरस्टार नागार्जुन आणि आयशा टाकिया हे होते. यानंतर तिने ‘महानंदी’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर तिला तिच्या घरी जायचे होते. परंतु दिग्दर्शक एस.एम.राजामौली यांनी तिला एका चित्रपटाची ऑफर दिली. तिने रवी तेजासोबत ‘विक्रमकुर्दु’ या चित्रपटात काम केले. यानंतर अनुष्का साऊथमधील एक लोकप्रिय अभिनेत्री झाली.

यानंतर अनुष्का थांबली नाही, तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. तिने तमिळ, तेलुगू आणि कन्नडसोबत इतर भाषांमध्ये देखील काम केले. तिने जवळपास 30 चित्रपटात काम केले. सध्या ती साऊथमधील सर्वात महागडी अभिनेत्री आहे. तिने ‘स्टालिन’, ‘डॉन’, ‘अरुंधती’, ‘सिंघम’, ‘ओक्का मागाडू’, ‘बाहुबली’, ‘निःशब्दम’, ‘रुद्रमादेवी’, ‘लिंगा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

अनुष्का शेट्टी आणि प्रभास हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. अनेकवेळा अशा बातम्या आल्या आहेत की, ते दोघे लग्न करणार आहेत. परंतु त्यांनी या सगळ्या अफवा असल्याने सांगितले. अनुष्काने एका मुलाखतीत तिच्या आणि प्रभासच्या नात्याबद्दल सांगितले की, प्रभासला ती असा मित्र मानते ज्याला कॉल केल्यानंतर तिला वेळेचे भान राहत नाही. ती रात्री 3 वाजता देखील प्रभाससोबत बोलू शकते. ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर तर त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु त्यांनी कधीच त्यांच्यात असलेल्या नात्याचा स्वीकार केला नाही. ते चांगले मित्र आहेत हेच ते दोघेही म्हणतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वयाच्या ४२ व्या वर्षीही अविवाहित आहे प्रभास; अभिनेत्यामुळे थांबले होते अनुष्काचे लग्न, वाचा ‘तो’ किस्सा

प्रभासमुळे अनुष्का शेट्टीने ऐनवेळी दिला होता लग्नाला नकार, आजपर्यंत आहे अविवाहित

 

हे देखील वाचा