Saturday, March 2, 2024

नागार्जुन- तब्बूपासून ते अनुष्का- प्रभासपर्यंत, टॉलिवूडचे ‘हे’ 5 अफेअर्स होते भलतेच चर्चेत, पाहा यादी

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चित्रपट नेहमीच चर्चेत असतात. चित्रपटातील कथा, पात्र आणि डायलॉग या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना खूप भावतात. त्यामुळे अनेकदा बॉलिवूड प्रेक्षक देखील दाक्षिणात्य चित्रपट पाहण्यास पसंती दर्शवतात. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देखील नेहमीच चर्चा आणि गॉसिपिंग होत असते. तसेच टॉलिवूडमधील अनेक अफेअर्सबाबत देखील नेहमीच चर्चा होत असतात. चला तर जाणून घेऊया टॉलिवूडमधील काही अफेअर्स, जे जोरदार चर्चेत होते…

अनुष्का शेट्टी- प्रभास
प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या अफेअर्सच्या चर्चा सर्वत्र खूप पसरल्या होत्या. मात्र,  नेहमी प्रमाणेच त्यांनी त्यांच्यात खूप चांगली मैत्री असून या सगळ्या अफवा पसरत असल्याचे सांगितले आणि या गोष्टींकडे कानाडोळा केला. त्या दोघांनी ‘बाहुबली’ या चित्रपटात एकत्र काम केले. त्यानंतर या चर्चांना खूपच उधाण आले होते. (Nagarjun-tabbu to anushka shetty Prabhas trending affairs of tollywood)

नागार्जुन-तब्बू
टॉलिवूड किंग नागार्जुन अक्किनेनी आणि बॉलिवूड अभिनेत्री तब्बू यांच्या अफेअर्सबाबत अनेक बातम्या समोर आल्या होत्या. नागार्जुन यांचे लग्न अमलासोबत झाले होते. नागार्जुन आणि अमला हे एक आदर्श जोडपे आहे. त्यातच त्यांच्या आणि तब्बूच्या अफेअर्सच्या चर्चा समोर आल्याने त्याच्यातील काही गोष्टी बदलल्या. मात्र, जेव्हा या अफवा बंद झाल्या, तेव्हा कुठे जाऊन नागार्जुन आणि अमलामधील नाते पूर्वीसारखे झाले.

रायलक्ष्मी-श्रीसंत
रायलक्ष्मी हिने अनेक चित्रपटात काम केले आहे. ती पूर्व क्रिकेटर श्रीसंतसोबत रिलेशनमध्ये होती. मात्र, श्रीसंतने या गोष्टीला नकार दिला होता. त्यानंतर त्यांच्याबाबत अनेक बातम्या समोर आल्या होत्या.

Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/RoseTreat

तमन्ना भाटिया- कार्थी
अभिनेत्री तमन्ना भाटिया ही नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्याबाबत अशा अफवा येत होत्या की, ती तमिळ अभिनेता कार्थीसोबत रिलेशनमध्ये आहे. मात्र, त्यांनी या गोष्टी नाकारल्या होत्या. तिने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “अभिनेत्री असल्याकारणाने पसरत असलेल्या अफवांवर बोलणे माझे काम आहे. मी कार्थीवर प्रेम करत नाही. मी असे देखील म्हणत नाही की, तो माझा चांगला मित्र नाहीये. तो फक्त माझा सहकारी आहे. जर मी कोणावर प्रेम करत असेल, तर त्या गोष्टीला मी कधीच नकार देणार नाही. मी आनंदाने या गोष्टीचा स्वीकार करेल.”

तृषा- राणा दग्गुबती
राणा दग्गुबतीचे नाव अभिनेत्री श्रिया सरनसोबत सुरुवातीला जोडले होते. मात्र, तृषा कृष्णनसोबत असलेले त्याचे रिलेशन खूप चर्चेत आले होते. काही काळ डेट केल्यानंतर ते दोघे वेगळे झाले. त्याने एकदा सांगितले होते की, “आम्ही खूप चांगले मित्र होतो, आम्ही रिलेशनमध्ये देखील होतो, परंतु आता आमच्यात गोष्टी पहिल्यासारख्या राहिल्या नाही.”

यानंतर त्याच्या रिलेशनबाबत जास्त कोणी वक्तव्य केले नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ व्यक्तीच्या भेटीनंतर बदलले अनुष्का शेट्टीचे आयुष्य, प्रभाससोबत असणाऱ्या नात्यामुळे नेहमीच असते चर्चेत

वयाच्या 42 व्या वर्षीही अविवाहित आहे प्रभास; अभिनेत्यामुळे थांबले होते अनुष्काचे लग्न, वाचा ‘तो’ किस्सा

हे देखील वाचा