सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझवरील अं’मली पदार्थ प्रकरणात जामीन मिळाला आहे. मात्र, हे प्रकरण अद्याप थांबायचे नाव घेत नाहीये. या प्रकरणात दररोज नवनवीन गोष्टी घडताना दिसत आहेत. अनेक लोकांची नावे या प्रकरणात जोडली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक दररोज नवनवीन आरोप नवनवीन लोकांवर करत आहेत. अशातच त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज भारतीय यांच्यावरही निशाणा साधला आहे. मलिकांनी आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीकडून २५ कोटी रुपयांची वसूली प्रकरणाचा मास्टर माईंड मोहित कंबोज असल्याचे सांगितले आहे. यामध्ये आता सोशल मीडियावरील प्रसिद्ध चेहरा हिंदुस्तानी भाऊने उडी घेतली आहे.
हिंदुस्तानी भाऊने नवाब मलिकांचा विरोध करत मोहित कंबोज यांना पाठिंबा दिला आहे. मोहित कंबोज यांनी हिंदुस्तानी भाऊचा एक व्हिडिओ अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत हिंदुस्तानी भाऊने म्हटले आहे की, “मोहित कंबोज तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. तुम्ही नशेडी, गंजेडी लोकांविरुद्ध जे आंदोलन उभे केले आहे, जे पाऊल उचलले आहे, त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मी तुमच्यासोबत आहे.” (Famous Hindustani Bhau Supports Mohit Kamboj Bhartiya Against Nawab Malik Over Aryan Khan Drugs Case)
Bharat Mata Ki Jai !
Jai Hind ! #DrugFreeIndia ???????? pic.twitter.com/3MmcSLZcNy— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) November 7, 2021
नवाब मलिकांनी मोहित कंबोजवर लावलाय ११०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप
नवाब मलिकांनी मोहित कंबोज यांच्यावर ११०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा आरोप लावला आहे. नवाब मलिकांनी म्हटले आहे की, आर्यन खानचे अपहरण करून खंडणी मागण्यासाठी संपूर्ण योजनेचा मास्टरमाईंड मोहित कंबोज होते. याला प्रत्युत्तर देत मोहित कंबोज यांनी म्हटले आहे की, “सत्यता समोर येत आहे, त्यामुळे नवाब मलिक घाबरले आहेत, आणि घाबरल्यामुळे काहीही बोलत आहेत. त्यांच्याकडे माझ्याविरुद्ध पुरावे असतील, तर समोर आणावे.”
कोण आहे हिंदुस्तानी भाऊ?
विकास जयराम पाठक असे मुंबईकर हिंदुस्तानी भाऊचे खरे नाव आहे. तो हिंदुस्तानी भाऊ या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. तरुणांमध्ये त्याची भन्नाट क्रेझ आहे. तो बिग बॉसमध्येही सामील झाला होता. हिंदुस्तानी भाऊला युट्यूब चॅनेलवर जवळपास १० लाखांपेक्षाही अधिक सबस्क्रायबर्स आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जड आवाजामुळे वर्गातून हाकलले जायचे, नंतर त्याच आवाजाने दिली खरी ओळख; वाचा पॉप क्वीन उषा उत्थुपबद्दल