टेलिव्हिजनवर ९० च्या दशकात ‘स्वाभिमान’ या मालिकेतून पाऊल ठेवणारी अभिनेत्री म्हणजे सिमोन सिंग. ‘स्वाभिमान’ या मालिकेत तिची अगदी छोटीसी भूमिका होती. यानंतर तिने ‘सी हॉक्स’, ‘अजीब दास्तां है ये’ आणि ‘थोडा है थोडे की जरुरत है’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. परंतु तिला खरी ओळख ‘हिना’ या मालिकेने दिली. या मालिकेत तिने टायटल रोल निभावला होता. त्यानंतर तिने परत कधीच मागे वळून देखील पाहिले नाही. तिची ही मालिका १९९८ पासून २००३ पर्यंत चालू होती. तिथून पुढे तिचे सिमोन हे नाव विसरून सगळेजण तिला हिना याच नावाने ओळखतात लागले. बुधवारी (१० नोव्हेंबर) सिमोन तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी.
सिमोनचा जन्म १० नोव्हेंबर १९७४ साली जमशेदपूर येथे झाला. तिने टेलिव्हिजनवर अनेक मालिकांमध्ये काम केले. ‘हिना’ या मालिकेने तिला एवढी ओळख दिली की, त्यानंतर तिला अनेक मालिकांमध्ये काम मिळाले. तिने ‘आंधी’, विरासत’, ‘एक हसीना थी’, ‘हक से’, ‘बहु बेगम’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. ‘एक हसीना थी’ या मालिकेत तिने वॅम्पची भूमिका निभावली होती. या भूमिकेने हे सिद्ध केले होते की, ती कोणत्याही प्रकारची भूमिका निभावू शकते. मालिकांसोबत तिने चित्रपटात देखील काम केले आहे. तिने २००१ साली ‘एक रिश्ता’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या चित्रपटात काम केले. यासोबत तिने ‘मैने प्यार किया’, ‘कल हो न हो’, ‘मॅरी गोल्ड’, ‘रण’, ‘पल पल दिल के पास’ आणि ‘लव्ह आज कल’ यांसारख्या चित्रपटात काम केले. (Simone singh birthday special : let’s know some unknown fact that her life)
वयाच्या ४७ व्या वर्षी देखील सिमोन आजही तेवढीच सुंदर आहे. तिच्या या सौंदर्याचे सिक्रेट तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी सौंदर्यासाठी काहीही करत नाही. ही मला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे. जो व्यक्ती आतून खुश असतो, तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. तोच आनंद कदाचित माझ्या सौंदर्याचे कारण असू शकते.”
अभिनय क्षेत्रात येण्याआधी सिमोन तिचे शिक्षण पूर्ण करून दिल्लीला गेली होती. तिथे तिने अनेक दिवस एका टीव्ही चॅनेलवर नोकरी केली. नंतर एका मित्राने बोलवल्यावर ती मुंबईला आली. मग त्यानंतर तिचे नशीब चमकले. सिमोन ही अशी एक भारतीय अभिनेत्री आहे जिने ‘न्यू यॉर्क इंटरनॅशनल एमी अवॉर्ड’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
ती सध्या अभिनयापासून दूर आहे, तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने तिच्या करिअरमध्ये खूप काम केले आहे. मालिकांमध्ये काम करणे ही त्याहून अवघड गोष्ट होती. परंतु नंतर तिच्या तब्येतीवर या सगळ्याच परिणाम होऊ लागला होता. म्हणून तिने मालिकांमध्ये काम करणे सोडून दिले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










