Monday, February 9, 2026
Home बॉलीवूड ‘तेजाब’ चित्रपटाला ३३ वर्ष पूर्ण, ‘या’ एका गाण्याने एका रात्रीत बनवले होते माधुरी दीक्षितला सुपरस्टार

‘तेजाब’ चित्रपटाला ३३ वर्ष पूर्ण, ‘या’ एका गाण्याने एका रात्रीत बनवले होते माधुरी दीक्षितला सुपरस्टार

अभिनेत्री माधुरी दीक्षित ही यशाच्या त्या शिखरावर पोहचली आहे, जिथे पोहचण्याचे स्वप्न प्रत्येक अभिनेत्री बघत असते. सुरूवातीला तिच्या वाट्याला अनेक फ्लॉप चित्रपट आले. त्यामुळे चित्रपटात घेण्यासाठी तिला नकार येऊ लागले होते. अशातच तिच्या झोळीत ‘तेजाब’, हा चित्रपट आला आणि तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. ११ नोव्हेंबर १९८८ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने माधुरीला खूप मोठी ओळख दिली. या सिनेमाने तिला एका रात्रीत स्टार केले. या चित्रपटानंतर तिने परत मागे वळून पाहिले नाही.

एन.चंद्रा यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत अनिल कपूर, चंकी पांडे, किरण कुमार, अनुपम खेर हे कलाकार होते. माधुरी दीक्षितने या चित्रपटात असा जलवा दाखवला की, ती प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली. या चित्रपटातील‌ ‘एक, दो, तीन’ हे गाणे आजही सुपरहिट आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ३३ वर्ष पूर्ण झाले आहेत. (Madhuri Dixit blockbuster successful movie tezzab turns 33)

या चित्रपटाची कहाणी डान्सरच्या आयुष्यावर आधारित होती. माध्यमातील वृत्तानुसार, अनिल कपूर यांना जेव्हा समजले की, या चित्रपटात माधुरी दीक्षित आहे. तेव्हा ते म्हणाले की, ‘माधुरी दीक्षित दिसायला तर चांगली आहे परंतु ती या डान्ससाठी योग्य नाही.’ परंतु जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा तिचा डान्स बघून सगळ्यांचे भान हरपले होते. बॉक्स ऑफिसवर चित्रपट खूप चालला होता.

माधुरी दीक्षितला ज्या गाण्याने आणि डान्सने ‘मोहिनी’ या नावाने प्रसिद्ध केले आणि यश मिळवून दिले, त्यात एका व्यक्तीचे नाव घेतले नाही तर चुकीचे ठरेल. ती व्यक्ती म्हणजे कोरीओग्राफर सरोज खान. माध्यमांशी बोलताना माधुरीने सांगितले की, “सरोजजींसोबत मी तेव्हा पहिल्यांदा काम करत होते. त्यांना असे वाटत होते की. मी इंडियन क्लासिकल डान्स चांगला करते; परंतु मला वेस्टर्न डान्स जमणार नाही. गाण्याच्या शूटिंग आधी सरोजजींनी अनेकवेळा माझ्याकडून सराव करून घेतला. त्यावेळी मी बॉलिवूड डान्स स्टाईल शिकले. मला असे वाटते की, ‘एक, दो, तीन’ वर मी चांगला डान्स केला परंतु सरोजजींशिवाय हे शक्य नव्हते.”

या गाण्याची शूटिंग मेहबूब या स्टुडिओमध्ये झाली होती. परंतु जेव्हा हे गाणे प्रदर्शित झाले तेव्हा निर्मात्यांना वाटले की, या गाण्याचे मेल व्हर्जन देखील असले पाहिजे. मेल व्हर्जन गाण्याची शूटिंग तिथे झाली जिथे आता शाहरुख खानचा ‘मन्नत’ हा बंगला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

मालिकेतून मिळालेल्या प्रसिद्धीपेक्षा अफेयरमुळे जास्त चर्चेत आली अभिनेत्री दिशा परमार

श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये

कधीही दारू न पिणाऱ्या जॉनी वॉकर यांनी व्हिस्कीच्या ब्रँडवरून ठेवले होते स्वतःचे नाव

हे देखील वाचा