बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी ‘बिग बॉस’मध्ये एक मजबूत स्पर्धक म्हणून पाहिली जाते आणि जर तुम्हाला तिचा ‘बिग बॉस’मधील खेळ आवडत असेल, तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. नुकत्याच आलेल्या एका वृत्तामध्ये शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याचा दावा करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊया शमीताला घरातून बाहेर का पडावे लागले.
शमिता गेली घराबाहेर
शमिता ‘बिग बॉस १५’ ची सदस्य आहे. आता या शोमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे की, निर्मात्यांनी तिला बिना एलिमिनेशनचेच घराबाहेर काढले आहे. मेडिकल इमर्जन्सी असल्याचे कारण सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शमिताची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर शमिताला निर्मात्यांनी उपचारासाठी घराबाहेर काढले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, शमिता मेडिकल तपासणीनंतर घरात परत येऊ शकते.
प्रकृती खराब असल्याने पडला बाहेर
दोन आठवड्यांपूर्वी वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन घरी आलेला शमिताचा खास मित्र राकेश बापटही मेडिकल एमर्जन्सीमुळे घराबाहेर पडला आहे. तो पोटात दुखत असल्याची तक्रार करत होता. त्यानंतर निर्मात्यांनी राकेश बापला रुग्णालयात दाखल केले. आता शमितालाही निर्मात्यांनी मेडिकल कारणावरून घराबाहेर काढले आहे.
अफसाना आहे बाहेर
गेल्या आठवड्यात निर्मात्यांनी एक धक्कादायक एलिमिनेशन केले. वादानंतर नियंत्रणाबाहेर गेलेल्या अफसाना खानला बिग बॉसनेच घरातून बाहेर काढले होते. घरात वाद सुरू असताना अफसाना खानने हातात चाकू घेतला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
चाहत्यांना बसेल धक्का
माध्यमांतील वृत्तानुसार, या आठवड्यात वीकेंड का वारमध्ये निर्माते कोणत्याही सदस्याला घराबाहेरचा रस्ता दाखवणार नाहीत. अफसाना खानचे धक्कादायक एलिमिनेशन हे त्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे. आता शमिता शेट्टीही घराबाहेर पडल्यावर या गेम शोमध्ये मोठा बदल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या
-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद
-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी