‘बिग बॉस मराठी’चे दुसरे पर्व खूपच गाजले होते. यासोबत या घरातील अतरंगी स्पर्धक देखील गाजले होते. यातील एक सर्वत्र चर्चेत असणारा स्पर्धक म्हणजे अभिजीत बिचुकले. या शोनंतर तो खूपच चर्चेत आला होता. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार अभिजीत हा आता ‘बिग बॉस १५’ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करणार आहे. रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जीसोबत तो देखील या शोमध्ये एन्ट्री करणार आहे.
अभिजीतबाबत हिंदी बिग बॉस प्रेमींना ही गोष्ट माहित नसेल की, त्याने जेलची हवा देखील खाल्ली आहे. चेक बाऊन्स प्रकरणात तो जेलमध्ये होता. त्याला पोलिसांनी ‘बिग बॉस मराठी’च्या सेटवरून अटक केले होते. (Bigg boss 15 wild card contestant abhijeet bichukale jail controversy unknown facts)
अभिजीत विरोधात सातारा कोर्टामध्ये अटक वॉरंट आले होते. त्याला जेव्हा अटक केली, तेव्हा घरातील सगळेच सदस्य हैराण झाले होते. त्याला अटक केली ती घटना २०१५ साली घडली होती. त्याला अटक करण्याआधी अनेकवेळा समज दिली होती, परंतु त्याने न ऐकल्यामुळे त्याला अटक वॉरंट देण्यात आले.
अभिजीतला राजकारणात विशेष रस आहे. देशाचे पंतप्रधान बनण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याने २०१९ मध्ये सातारा विधानसभामध्ये अपक्ष उमेदवारी लढवली होती. ज्यात तो खूप वाईट पद्धतीने हारला होता. तरी देखील त्याचा आत्मविश्वास कमी झाला नाही. त्याला देशातील सगळ्या निवडणुका लढायच्या आहेत.
तसे पाहायला गेलं, तर अभिजीत बिचुकले एक मजेशीर व्यक्ती आहे. त्यामुळे अनेकांना तो आवडतो. हिंदी बिग बॉसमध्ये आल्यावर तो खूप हंगाम करणार आहे यात काही वादच नाही. जेव्हा सलमान खान ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आला होता, तेव्हाच त्याने अभिजीत बिचुकलेला सांगितले होते की, तो त्याला ‘बिग बॉस १५’ मध्ये घेणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उर्मिला कोठारेने केला एरियल डान्स, व्हिडिओ पाहून हटणार नाहीत तुमच्याही नजरा!