Wednesday, March 12, 2025
Home मराठी अमृत खानविलकरचा सोज्वळ अंदाज आला समोर, कमेंट करत श्रेया बुगडे म्हणाली…

अमृत खानविलकरचा सोज्वळ अंदाज आला समोर, कमेंट करत श्रेया बुगडे म्हणाली…

अभिनेत्री अमृता खानविलकर ही अभिनयासोबत तिच्या डान्समुळे देखील सर्वत्र चर्चेत आहे. तिच्या मनमोहक नृत्याविष्काराने ती नेहमीच सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. ‘नटरंग’ या चित्रपटातील तिच्या ‘वाजले की बारा’ या लावणीने तर आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले होते. सोशल मीडियावर देखील अनेकवेळा ती तिचे डान्स व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिचे साडीमधील काही फोटो समोर आले आहेत.

अमृताने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने लाल रंगाची अत्यंत सुंदर अशी साडी आणि त्याला मॅचिंग ब्लाऊज घातला आहे. यासोबत तिने लाल डायमंड असलेला नेकलेस तसेच बिंदी लावली आहे. तसेच सगळे केस मागे बांधून तिने कपाळी छोटीशी टिकली लावली आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (marathi actress amruta khanvilkar share her photo on social media)

तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा लूक खूप आवडला आहे. तिच्या या फोटोवर अभिनेत्री सोनाली खरे हिने “स्टनिंग,” अशी कमेंट केली आहे, तर श्रेया बुगडे हिने “गुड गोड,” अशी कमेंट केली आहे. तसेच मनीषा केळकर हिने “खूप सुंदर गं,” अशी कमेंट केली आहे.

अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘नटरंग’, ‘चोरीचा मामला’, ‘वेलकम जिंदगी’, ‘बाजी’, ‘वेल डन बेबी’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘जीवलगा’ या लोकप्रिय मालिकेत देखील काम केले आहे. या मालिकेत तिचासोबत स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे हे कलाकार होते.

तिने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर ती बऱ्याच चित्रपटात पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर तिने हिंदी चित्रपटातही बऱ्याच महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचा ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. याशिवाय लवकरच ती ‘पॉंडीचेरी’ या मराठी चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपटपटांनंतर आता टीव्ही मालिकेत वाजणार सचित पाटीलच्या अभिनयाचा डंका, लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

-विक्रम गोखलेंवर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर अवधूत गुप्तेची भलीमोठी पोस्ट, म्हणाला, ‘माझ्यावर विश्वास ठेवून…’

-उर्मिला कोठारेने केला एरियल डान्स, व्हिडिओ पाहून हटणार नाहीत तुमच्याही नजरा!

हे देखील वाचा