Wednesday, February 4, 2026
Home अन्य प्रसिद्ध पंजाबी लोक गायक गुरमीत बावा यांचे निधन, दीर्घकाळापासून होत्या आजारी

प्रसिद्ध पंजाबी लोक गायक गुरमीत बावा यांचे निधन, दीर्घकाळापासून होत्या आजारी

पंजाबी लोक गायक गुरमीत बावा यांचे रविवारी (२१ नोव्हेंबर) निधन झाले. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. शनिवारी रात्री गुरमीत बावा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अमृतसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ७७ वर्षीय गुरमीत यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सोमवारी (२२ नोव्हेंबर) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संगीत विश्वात पसरली शोककळा
गुरमीत बावा यांच्या निधनाने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. पंजाबी लोकगायनात गुरमीत बावाच्या नावावर ४५ सेकंदांचा हेक रेकॉर्ड होता. गुरमीतला त्यांच्या कारकिर्दीत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले होते. ‘जुगनी’ या गाण्याच्या गायकांपैकी त्या एक होत्या. तसेच गुरमीत बावा या पहिल्या पंजाबी महिला गायिका होत्या, ज्यांनी दूरदर्शनवर गाणी गायली.

‘या’ पुरस्कारांनी करण्यात आले सन्मानित
गुरमीत बावा यांचे लग्न पंजाबी लोक गायक किरपाल बावासोबत झाले होते. दोघांना तीन मुली आहेत. १९९१ मध्ये पंजाब सरकारने त्यांना केंद्रीय पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय त्यांना पंजाब नाटक अकादमीचा संगीत पुरस्कार, मध्यप्रदेश सरकारचा राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार आणि पंजाबी भाषा विभागाचा शिरोमणी गायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुरमीत बावा यांचे असे जाणे हे संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शोएब- दीपिकाच्या कुटुंबातील ‘या’ सदस्याने गमावले प्राण, लाडक्याच्या जाण्याने अभिनेत्रीला अश्रू अनावर

-जेव्हा आपला चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात पोहचल्या साधना; दिसले ‘असे’ काही की, मैत्रिणींसमोरच कोसळले रडू

-खरंच की काय! तिसरं लग्न करायला आमिर खान झालाय सज्ज? ‘या’ अभिनेत्रीसोबत रंगलीय लग्नाची चर्चा

हे देखील वाचा