शोएब- दीपिकाच्या कुटुंबातील ‘या’ सदस्याने गमावले प्राण, लाडक्याच्या जाण्याने अभिनेत्रीला अश्रू अनावर


टेलिव्हिजन अभिनेता शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर यांच्या घरात सध्या शोकाचे वातावरण आहे. दीपिका दुःखी आहे. त्याचे मोठे कारण म्हणजे, त्यांच्या कुटुंबातील एक लाडका सदस्य त्यांना सोडून गेला आहे. हे दोघेजण त्या सदस्याच्या जाण्याच्या दु:खातून सावरू शकत नाहीयेत. दीपिका आणि शोएबने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करून त्या सदस्याचे महत्त्व सांगितले आहे.

शोएब इब्राहिमने त्याच्या यूट्यूबवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून त्याच्या चाहत्यांनाही आपले अश्रू अनावर झाले आहेत. कारण या व्हिडिओमध्ये हे आवडते कलाकार स्वतः रडत आहेत. शोएबची पत्नी दीपिकाही या व्हिडिओमध्ये आहे. दीपिकाने व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, तिच्या घरातील सर्वात प्रिय सदस्य ‘कडल’ याचे निधन झाले आहे. कडल हे त्यांच्या कुत्र्याचे नाव आहे. या जोडप्याने आपल्या कुत्र्याला आपले कुटुंब मानले होते. व्हिडिओद्वारे दीपिकाने तिची व्यथा चाहत्यांसोबत शेअर केली आहे. (the death of this special member of shoaib dipikas family the couple shared their pain by sharing the video)

दीपिकाने सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिने ‘कडल’ला गमावले. तिचा कुत्रा बऱ्याच काळापासून आजारी होता. त्याला अस्थमा होता आणि कॅन्सरचाही त्रास होता. या संपूर्ण व्हिडिओमध्ये दीपिका रडताना दिसली आहे. यावरून त्यांचा कुत्रा दीपिकासाठी किती खास होता हे दिसून येते. सोबतच तिने सांगितले की, तिच्या कुत्र्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिला माहीत नव्हते की, तिने घेतलेला हा फोटो तिचा तिच्या कडलसोबतचा शेवटचा फोटो असेल. इंस्टाग्रामवर कडलसोबतचा एक फोटो शेअर करताना दीपिकाने त्याच्या मृत्यूची माहिती दिली.

फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “त्याच्यासोबतचा हा माझा शेवटचा फोटो असेल हे मला कधीच माहीत नव्हते. त्याला डॉक्टरांकडे नेले तेव्हा बरोबर एक दिवस आधीची ही गोष्ट आहे. तो एक्स-रे रूममधून बाहेर आला आणि मी त्याला मिठी मारली. गेल्या एक वर्षापासून त्याची तब्येत बरी नव्हती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून परिस्थिती कठीण झाली होती. शेवटचा दिवस अतिशय नाजूक होता. त्याने खूप संघर्ष केला आणि आज पहाटे ३ वाजता त्याने निरोप घेतला. कडल याचे निधन झाले.” त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनीही शोक व्यक्त केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपटपटांनंतर आता टीव्ही मालिकेत वाजणार सचित पाटीलच्या अभिनयाचा डंका, लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

-विक्रम गोखलेंवर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर अवधूत गुप्तेची भलीमोठी पोस्ट, म्हणाला, ‘माझ्यावर विश्वास ठेवून…’

-उर्मिला कोठारेने केला एरियल डान्स, व्हिडिओ पाहून हटणार नाहीत तुमच्याही नजरा!


Latest Post

error: Content is protected !!