Sunday, July 14, 2024

जेव्हा आपला चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात पोहचल्या साधना; दिसले ‘असे’ काही की, मैत्रिणींसमोरच कोसळले रडू

अभिनेत्री साधना या ६० च्या दशकात एक नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. त्या केवळ सुंदर नव्हे तर एक फॅशन आयकॉन देखील होत्या. तसेच कपाळावर येणाऱ्या छोट्या छोट्या केसांमुळे त्यांची हेअरस्टाइल प्रसिद्ध झाली होती. आजही अनेक मुली साधना कट करून ती हेअर स्टाईल करतात. खूप कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की, ६० च्या दशकातील साधना अशा अभिनेत्री होत्या, ज्यांनी अभिनयासोबत दिग्दर्शनामध्ये देखील पाऊल ठेवले होते. ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन साधना यांनी केले होते. त्या यशाच्या शिखरावर पोहचल्या होत्या, परंतु तिथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबाबत काही रंजक किस्से.

साधना यांनी १५ वर्षाच्या असताना डान्स शिकण्यास सुरुवात केली आणि त्यात त्यांनी प्रावीण्य प्राप्त मिळवले. त्यांनी ‘श्री ४२०’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ‘रमया वस्तावया’ या गाण्यावर डान्स केला होता. त्यांचा हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्या त्यांच्या मैत्रिणींसोबत थिएटरमध्ये हा चित्रपट बघण्यासाठी गेल्या. परंतु चित्रपट संपला तरी देखील ते गाणे आले नाही आणि शेवटपर्यंत साधना स्क्रीनवर दिसल्या नाही. एडिटिंगमध्ये त्यांचा डान्स कट केला होता. या नंतर त्यांच्या मैत्रिणींसमोर त्यांना अपमान झाल्यासारखे वाटले आणि त्या रडायला लागल्या होत्या. ( Actress sadhna started her career as a dancer she was shocked when her dance scene was not there)

साधना यांचे पूर्ण नाव साधना शिवदासनी हे होते. पाकिस्तानमधील कराची शहरात एका सिंधी परिवारात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील हरी शिवदासनी अभिनेते होते. भारत पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर साधना त्यांच्या कुटुंबासोबत मुंबईला आल्या. आई वडिलांची एकुलती एक लेक असून देखील ८ वर्षापर्यंत त्यांनी शाळेचे तोंड देखील बघितले नव्हते. परंतु नंतर त्यांनी ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

त्यांनी एक अभिनेत्री म्हणून ‘लव्ह इन शिमला’ मध्ये पहिल्यांदा काम केले. या चित्रपटात जॉय मुखर्जी हे त्यांचे हिरो होते. या चित्रपटाने त्यांना खूप यश मिळवून दिले. त्यानंतर त्यांनी परत मागे वळून पाहिले नाही. रातोरात स्टार बनलेल्या साधना यांना या सगळ्यात देवानंद यांची साथ मिळाली होती. त्यांच्या जोडीला सगळ्यांनी पसंती दर्शवली होती. काळानुसार साधना यांची ओळख वाढत गेली.

परंतु म्हणतात ना, सगळे दिवस काही सारखे नसतात. जशी राजेश खन्ना यांची प्रसिद्धी जास्त काळ टिकली नाही तसेच वयानुसार साधना यांचे सौंदर्य देखील कमी होऊ लागले. ७० च्या दशकात जेव्हा त्यांचे ग्लॅमर कमी झाले, तेव्हा त्यांना सहाय्यक भूमिका मिळायला लागल्या. ज्या करण्यास साधना अजिबात तयार नव्हत्या. नंतर काही दिवसांनी त्या चित्रपटसृष्टीपासून दूर झाल्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
साराशी ब्रेकअप झाल्यानंतर कार्तिक आर्यनने केला लव्हलाईफचा खुलासा; म्हणाला, ‘मी मागील एक वर्षापासून…’
धनुषच्या ‘या’ सिनेमाचा परदेशातही डंका! बनला अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणारा तिसरा तमिळ चित्रपट

साऊथच्या अभिनेत्रीने निर्मात्याशी थाटला संसार; नवरदेवाला पाहताच नेटकरीही म्हणाले, ‘हे कसं शक्य?’

हे देखील वाचा