सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लाडकी लेक अभिनेत्री श्रिया पिळगावकरने अगदी कमी वयात खूप नाव कमावले आहे. अल्पावधीतच तिने चाहत्यांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सतत सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत राहते. ती दिवसागणिक स्टाईल आयकॉन बनत चालली आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक नजर टाकली की ही बाब सहज तुमच्या लक्षात येईल.
नुकतेच श्रियाने स्वतःचे एक फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. हे ब्लॅक ऍंड व्हाईट फोटो आहेत, ज्याद्वारे तिने चाहत्यांना तिच्या कमाल सौंदर्याची झलक दाखवली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि जीन्स परिधान केली आहे. सोबतच तिने केस मोकळे सोडले आहेत. या स्टायलिश लूकमध्ये श्रिया खूपच सुंदर दिसत आहे. (shriya pilgaonkar shared her black and white photoshoot)
तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहते यावर सातत्याने कमेंट करून तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत. तसेच ही पहिलीच वेळ नाहीये, तर या अगोदरही तिचे असे फोटोशूट्स बऱ्याचदा व्हायरल झाले आहेत. शिवाय या फोटोला २८ हजाराहून अधिक युजर्सने लाईक केलं आहे.
कामाबद्दल बोलायचे झाले, तर श्रिया लवकरच ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती ‘अरुंधती’चे पात्र साकारणार आहे, जी एक पत्रकार असते. यात तिच्यासोबत पुलकित सम्राट, झोया हुसेन आणि राणा दुग्गाबत्ती मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच चित्रपट तेलगू भाषेत ‘अरण्य’ म्हणून, तर तमिळमध्ये ‘कदान’ म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती
-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा
-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…