Friday, March 29, 2024

सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लग्नाआधी त्याची पहिली पत्नी अमृता सिंगने त्याला एक चिठ्ठी लिहिली होती. सैफ आणि अमृताचे लग्न १९९१ मध्ये झाले होते. त्यांना दोन मुलं आहेत सारा अली खान आणि अब्राहिम खान. सैफ जेव्हा २०१२ मध्ये करीनासोबत लग्न करणार होता, तेव्हा त्याने अमृतासाठी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यानंतर त्याने त्याची मुलगी साराला फोन केला होता. सैफ अली खानने त्याच्या आयुष्यातील हे गुपित करण जोहरच्या ‘कॉफी विद करण शो’ मध्ये सांगितले होते.

सैफ अली खानने ‘कॉफी विथ करण शो’ मध्ये सांगितले होते की, तो करीनासोबत लग्न करणार होता. परंतु त्याचवेळी त्याने अमृताला एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत असे लिहिले होते की, “एक नवीन चॅप्टर सुरू होणार आहे. आपल्याकडे आपला एक भूतकाळ आहे.” सैफने सांगितले की, हे पत्र लिहिल्यानंतर त्याने ते करीनाला देखील दिले होते आणि तिला वाचायला सांगितले होते. (Saif Ali Khan writes letter to ex wife amrita singh before marrying kareena kapoor)

सैफने करीनाने दिलेली प्रतिक्रिया देखील कॉफी विथ करण या शोमध्ये शेअर केली होती. सैफने सांगितले होते की, करीना म्हणाली होती की, हे खूप छान लिहिले आहे. हे वाचल्यानंतर लगेचच त्याची मुलगी साराला फोन केला आणि ती म्हणाली की, “पप्पा तुम्हाला माहित आहे की, मी तुमच्या लग्नात आलेच असते, परंतु आता मी अगदी आनंदाने तुमच्यात लग्नात येणार आहे.”

करीना कपूर ही सैफ अली खानपेक्षा खूप लहान आहे. सैफ अली आणि अमृताचे लग्न झाले होते, तेव्हा त्या लग्नाला करीना देखील गेली होती. त्यावेळी ती खूपच लहान होती. करीना आणि सैफ आला दोन मुले आहेत. एकाचे नाव तैमूर तर दुसऱ्याचे नाव जेह आहे. ते दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. तसेच सैफची मुलगी सारा अली खान हे एक अभिनेत्री आहे. तिने देखील चांगलेच नाव कमावले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा

-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ

-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल

हे देखील वाचा