मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे अभिनेता स्वप्नील जोशी होय. त्याच्या अभिनयाने आणि रोमँटिक सीन्सने अवघ्या महाराष्ट्राला त्याच्या प्रेमात पडले आहे. सोशल मीडियावर देखील स्वप्नील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींची माहिती तो सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना देत असतो. अशातच त्याच्या आयुष्यात एक मोठी आनंदाची गोष्ट घडली आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
स्वप्नीलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. स्वप्नीलने एक गोड बातमी दिली आहे. ती म्हणजे स्वप्नीलने नवीन जॅग्वार गाडी विकत घेतली आहे. त्याने गाडी घेताना त्याच्या कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यावेळी तो त्याच्या कुटुंबासोबत दिसत आहे. तसेच त्याने त्याच्या या नवीन गाडीसोबत देखील एक फोटो शेअर केला आहे. (Marathi actress swapnil Joshi share a photo with his new car on social media)
हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “हे आज घडलं आहे. पुमाची गाडी आली. The jaguar I-pace all electric. बाप्पा मोरया.” त्याचे शेअर केलेल्या फोटोवर अनेक चाहते तसेच अनेक कलाकार कमेंट्स करून त्याला शुभेच्छा देत आहेत. त्याच्या या पोस्टवर श्रेया बुगडे हिने “आली रे आली” अशी कमेंट केली आहे. भरत जाधव याने “वा मस्त खूप खूप शुभेच्छा” अशी कमेंट केली आहे. तसेच रितेश देशमुख याने “अभिनंदन भाऊ” अशी कमेंट केली आहे. यासोबतच समिधा गुरु, वरुण इमानदार, अमेय वाघ, मुक्ता बर्वे, अमृता खानविलकर, सोनाली खरे यांसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वप्नील जोशी हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा कलाकार आहे. त्याने मराठी चित्रपटसृष्टीला एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याने ‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘भिकारी’, ‘तू ही रे’, ‘मितवा’, ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘लाल इश्क’, ‘फुगे’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा