सध्या बी-टाऊनमधील सर्वाधिक चर्चेत असलेले कपल विकी कौशल आणि कॅटरिना कैफ त्यांच्या लग्नात व्यस्त आहेत. माध्यमातील वृत्तानुसार दोघेही ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. लव्हबर्ड्सनी या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली, तरी चाहते आणि मीडिया रिपोर्ट्सने गेल्या १ महिन्यापासून या जोडप्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले आहे.
कॅटरिनाला विकीच्या घरी किंवा शॉपिंग करताना स्पॉट करणे, तसेच विकीच्या मित्रांपासून ते इव्हेंट कंपनीपर्यंत, पॅपराजी आणि मीडियाने लग्नाशी संबंधित प्रत्येक लहान तपशील काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही गोष्ट विकी कौशलचे वडील आणि कॅटरिना कैफचे सासरे शाम कौशल यांना चांगलीच माहीत आहे. त्यामुळेच शाम कौशल यांनी मुलाच्या लग्नाच्या आनंदात पॅपराजींसाठी स्टार्टर फूडची व्यवस्था केली. (katrina kaif vicky kaushal wedding to be groom s father sham kaushal showed kind gesture towards paps)
विकी कौशल आणि त्याचे कुटुंबीय लग्नासाठी जोधपूरला जाणार होते. कॅमेऱ्यातून काहीही मिस होऊ नये, म्हणून पॅपराजी आधीच वराच्या घराबाहेर उभे होते. अशा परिस्थितीत विकी आणि भाऊ सनी कौशल ड्रायव्हर आणि वडील शाम यांच्यासोबत, पॅपराजींसाठी स्टार्टर फूडची व्यवस्था करताना दिसले.
याआधी कॅटरिना आणि तिची आई सुझैन देखील विकीच्या घरी स्पॉट झाली होती. यावेळी कॅटरिनाने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. तसेच हलके दागिने घातले होते.
रिपोर्ट्सनुसार, या खास प्रसंगी फक्त जवळचे मित्र आणि जोडप्याचे कुटुंबीयच उपस्थित असतील. दरम्यान गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग जोधपूरला जाताना स्पॉट झाले, तेव्हा चाहत्यांनी आणि मीडियाने याला विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाशी जोडून पाहिले. मिळालेल्या माहितीनुसार, नेहा आणि रोहनप्रीत जोधपूरमध्ये एका मोठ्या लग्नात परफॉर्म करणार आहेत. मग कॅटरिना आणि विकीचेच हे मोठे लग्न तर नाही ना?
माध्यमातील वृत्तानुसार, दोघे राजस्थानमध्ये थाटामाटात लग्न करणार आहेत. त्यासाठी आतापासूनच वेगवेगळी तयारी सुरू आहे. या लग्नासाठी लव्हबर्ड्सचे कुटुंब ६ डिसेंबरला जोधपूरला रवाना होणार आहे. सूत्रांनुसार, दोघांचे लग्न पंजाबी पद्धतीने होणार आहे. ज्यामध्ये हळद, मेहंदी या विधी पूर्ण होतील. या दोघांनी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे शाही विवाह करण्याचा प्लॅन केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…










