Thursday, April 25, 2024

असे काय झाले की, महिला स्पर्धकासमोर रणवीर सिंगला झुकवावे लागले डोके? व्हिडिओ जोरदार व्हायरल

सध्या छोट्या पडद्यावरील एक शो चांगलाच चर्चेत असल्याचे दिसत आहे. त्या शोमध्ये अनेक रंजक गोष्टी पाहायला मिळतात. हा शो इतर कोणता नसून तो ‘द बिग पिक्चर’ हा आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग करताना दिसतो. या शोमध्ये स्पर्धक फोटोंशी निगडीत प्रश्नांची उत्तरे देतात. सोबतच ते आपल्या आयुष्यातील अनोखी गोष्टही सर्वांसोबत शेअर करतात. शोमार्फत लोकांच्या आयुष्यातील अनेक पैलू पाहायला मिळतात. रणवीर सिंग अनेकदा स्पर्धकांची दु:खद कहाणी ऐकून भावुक होतो. यावेळीही असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे, यावेळी रणवीर रडताना दिसला.

स्पर्धकासोबत रडताना दिसला रणवीर
रणवीरच्या या शोमधील पुढील एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अभिनेता एका महिला स्पर्धकाशी चर्चा करताना भावुक होतो. व्हिडिओत रणवीर स्पर्धकाशी त्यांची सून आणि मुलाबाबत विचारताना दिसत आहे. स्पर्धक सांगते की, तिचा मुलगा आणि सून केवळ ४ महिनेच सोबत राहू शकले होते. प्रोमो व्हिडिओत हे स्पष्ट झाले नाही की, त्यांच्या मुलासोबत काय झाले होते. (The Big Picture Ranveer Singh Bowed His Head In Front of The Contestant Said This With Folded Hands)

स्पर्धक पुढे बोलताना सांगते की, यानंतर तिने तिची सून कोमल हिचे दुसरे लग्न केले. रणवीर म्हणतो, “आईने मुलीचे लग्न केले, असे नेहमी ऐकतो, पण सासूने पुन्हा सुनेचे लग्न केले, असे क्वचितच ऐकायला मिळते.” यानंतर स्पर्धक भावुक होतात आणि रडू लागतात. रणवीरच्या डोळ्यातही अश्रू आल्याचे दिसते.

आदराने मान केली खाली
“सून आता आनंदी आहे, आम्हालाही ते आवडते,” असे स्पर्धक पुढे सांगते. यानंतर रणवीर आदराने हात जोडतो आणि मान खाली करत म्हणतो की, “माझं डोकं तुमच्यापुढे झुकलं.” हा प्रोमो व्हिडिओ कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “‘रोमा जींचा सासू ते आईपर्यंतचा प्रवास पाहा, फक्त ‘द बिग पिक्चर’ वर.”

‘या’ चित्रपटात झळकणार रणवीर सिंग
प्रोमो व्हिडिओला आतापर्यंत १ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शोच्या मंचावर कॅटरिना कैफ, सलमान खान, रोहित शेट्टी यांसारख्या कलाकारांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली आहे.

रणवीरच्या कमाबाबत बोलायचं झालं, तर तो लवकरच ‘८३’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रदर्शित होताच धुमाकूळ घातला आहे. तसेच यातील अभिनेत्याच्या लूकला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा